Home /News /entertainment /

बापरे! यामी गौतमच्या चेहऱ्याची झाली अशी अवस्था! पाहून तुम्हालाही भरेल धडकी

बापरे! यामी गौतमच्या चेहऱ्याची झाली अशी अवस्था! पाहून तुम्हालाही भरेल धडकी

अभिनेत्री यामी गौतम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते. ती सतत आपल्या अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असते.

  मुंबई, 15 सप्टेंबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री यामी गौतम(Yami Gautam) सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी गुपचूप लग्न करत यामी चर्चेत आली होती. तर आत्ता आपल्या 'भूत पुलिस' (Bhoot Police) या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. मल्टीस्टारर असणारा हा चित्रपट फारसं प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकला नाही. मात्र यातील यामी गौतमच्या भूमिकेच्या जोरदार चर्चा होत आहे. चित्रपटातून यामी भुताच्या रूपात आपल्या भेटीला आली आहे. नुकताच यामी गौतमने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'भूत पुलिस' चित्रपटातीळ आपल्या भूमिकेशी संबंधित काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. यामीचे हे फोटो पाहून चाहत्यांच्या तोंडातून OMG उद्गार निघत आहेत.
  अभिनेत्री यामी गौतम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते. ती सतत आपल्या अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असते. नुकताच यामीने आपल्या 'भूत पुलिस' चित्रपटातीळ काही BTS क्षण व्हिडीओच्या माध्यमातून आपल्याशी शेअर केले आहेत. याबद्दलचे अनुभव सांगत असताना, यामी म्हणाली अतिशय वेदनेनंतरही मी हे सर्व काही पूर्ण केलं आहे'. (हे वाचा:Met Gala 2021 दरम्यान सोशल मीडियावर ट्रेन्ड होतोय रणवीर सिंग) यामी गौतमने आपला अनुभव शेअर करत म्हटलं आहे, 'मला भयपट खूप आवडतात. म्हणून मी 'भूत अंकल'मध्ये हि भूमिका साकारली आहे. मला तयार होण्यासाठी तब्बल ३ तास लागत असे. तर या भूमिकेतून बाहेर येण्यासाठी ४५ मिनिटे मेहनत घ्यावी लागत. मला दररोज मोकळ्या पायांनी शूटिंग करावं लागत. तसेच हिमाचल प्रदेशमध्ये रात्री खूपच थंडी असते. अशावेळी मला हे शूट करावं लागत. माझ्या मानेवर जखम झाली होती. मात्र मला या भूमिकेसाठी सर्वकाही स्वतः करायचं होतं. म्हणून मी वेदनेतसुद्धा हे शूट पूर्ण केलं'. हे सर्व करण्यासाठी योगाने मला मोठी मदत केली.' (हे वाचा:रणबीर कपूर OTT वर करणार धमाकेदार एन्ट्री! अशी असणार स्क्रिप्ट) यामी पुढे म्हणते, 'मला योगमध्ये पारंगत व्हायचं होत. मात्र महामारीला ते मान्य नव्हतं. मला सेटवर जितकं जमेल तितकं मी करत असे. हे काही असे चॅलेंज आहेत. जे माझ्या करिअरमध्ये आपसूक येतात. आणि मी त्यांना मान्य करते. त्यांचा आनंद घेते. हे सर्व माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि कायम महत्वाचं असणार'.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood actress, Entertainment

  पुढील बातम्या