मुंबई, 10 ऑक्टोबर- 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) च्या तिसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा महेश मांजरेकर जयवर प्रचंड संतापलेले दिसले. नुकताच हा एपिसोड प्रसारित झाला.यामध्ये महेश मांजरेकरांनी (Mahesh manjrekar) कॅप्टन्सी टास्कचा आढावा सर्वांसमोर जाहीर केला. यावेळी त्यांनी जयवर (Jay Dudhane) निशाणा साधला.
View this post on Instagram
कलर्स मराठीवर 'बिग बॉस मराठी' हा रिऍलिटी शो आपल्या भेटीला येतो. दररोज शोमध्ये प्रचंड वादविवाद, चेष्टा मस्करी आणि प्रेम सर्व एकत्र पाहायला मिळतं. रसिक प्रेक्षकांना हा शो फारच पसंत पडतो. हा बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन आहे. आणि तिसऱ्या सीजनचा हा तिसरा आठवडा नुकताच पार पडला. यामध्ये स्पर्धकांच्या आठवडाभराच्या सादरीकरणावरून महेश मांजरेकरांनी काहींची पाठ थोपटली तर काहींना समजच डोस दिला.आठवड्यातील शनिवार आणि रविवार महेश मांजरेकर बिग बॉसच्या चावडीवर या स्पर्धकांची अशी शाळा घेतात. नुकताच असाच एक एपिसोड पार पडला.
(हे वाचा:Bigg Boss Marathi 3 च्या घरात मराठीतील 'हा' अभिनेता करणार वाईल्ड कार्ड एन्ट्री)
नुकतंच झालेल्या एपिसोडमध्ये महेश मांजरेकर यांनी घरात पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्कचा लेखाजोखा सांगितला. या टास्कमध्ये विशाल आणि जय हे कॅप्टनसाठी उभे होते. या वेळी टीम ए मधील एक स्पर्धक आणि टीम बीमधील एक स्पर्धक अश्या जोड्या करण्यात आल्या होत्या. या जोड्यांनी स्टेजवर एखादा डान्स परफॉर्मन्स करून नंतर आपलं मत उमेदवारांना द्यायचं होतं. या दोन्ही स्पर्धकांचं एकमत नाही झालं तर त्यांचं मत बाद करण्यात येई. दरम्यान दादूसने अविष्कारसोबत आपला डान्स पर्फोटमन्स केला. आणि नंतर अविष्कारसोबत एकमताने विशालला मत दिलं. त्यामुळे दादूसच्या ग्रुपमधील असणारा जय त्यांच्यावर प्रचंड भडकला होता. यातच त्याने ग्रुपमधील इतर सदस्यांना दादूसला आपल्या टीममध्ये न घेण्याचंसुद्धा सांगून टाकलं.
(हे वाचा:जीव माझा गुंतला' फेम अंतराचा ग्लॅमरस अंदाज;तुम्ही पाहिला का अभिनेत्रीचा हा लुक)
तसेच घरातील इतर स्पर्धक आपल्या ५ लोकांच्या टीमला घाबरतात वगैरे मुक्ताफळे उधळली आहेत. हे सर्व पाहून महेश मांजरेकर जयवंत प्रचंड चिडले होते. त्यांनी शनिवारच्या चावडीवर जयची चांगलीच फायरिंग केली. तसेच जयला प्रश्नही केला कोण घाबरत घरात? कोणाला आहे भिती? तू काय करणार आहेस दादूसला? अशी अनेक प्रश्न विचारत जयला डोस दिला आहे. तसेच जयला हिंदी शोधून आल्याचा माज न करण्याचा आणि ओव्हर कॉन्फिडन्स कमी करण्याचा सल्लाही दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.