मुंबई, 20 सप्टेंबर : बहुप्रतिक्षित Bigg Boss Marathi सीजन 3 सुरू झाला आहे. रविवारी 19 सप्टेंबरला ग्रँड प्रिमिअर झाल्यानंतर कोणते सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून येणार या बाबतची उत्सुकता अखेर संपली. स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात धमाकेदार एन्ट्री झाली. पण या सर्व स्पर्धकांपैकी दोघे जण हे पती-पत्नी होते. या दोघांचा घटस्फोटही झाला आहे. आता ही जोडी एकाच घरात एकमेकांसमोर आली आहे. काटा रुते कुणाला या मलिकेतून घराघरात पोहोचलेली स्नेहा वाघ आणि मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता अविष्कार दारव्हेकर यांचं लग्न झालं होतं. मात्र काही वर्षात त्यांचे मार्ग वेगळे झाले. वयाच्या 19व्या वर्षी स्नेहाचं अविष्कारसोबत लग्न झालं होतं. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. स्नेहाने घरगुती हिंसाचाराचे आरोप अविष्कारवर केले होते. स्नेहा आणि अविष्कार या दोघांनाही ते दोघेही याच शोमध्ये येणार असल्याची माहिती नव्हती. आता एकाच घरात या दोघांमध्ये नेमकी कशी केमेस्ट्री असेल, एकमेकांची साथ देणार की विरुद्ध उभे राहणार हे येत्या काळात दिसून येईल.
Bigg Boss Marathi 3: पहिल्याच दिवशी मीराचा तुफान राडा, कोण होणार नॉमिनेट? पाहा VIDEO
दरम्यान, स्नेहा वाघ, मीनल शाह, अक्षय वाघमारे, मीरा जगन्नाथ, विकास पाटील, सुरेखा कुडची, गायत्री दातार, तृप्ती देसाई, सोनाली पाटील, जय दुधाणे, उत्कर्ष आनंद शिंदे, शिवलीला बाळासाहेब पाटील, अविष्कार दारव्हेकर, संतोष चौधरी या स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात धमाकेदार एन्ट्री झाली.