मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO: '...अन् मी थेट तलावात' वीणा जगतापने सांगितला आपल्या काश्मीर ट्रीपचा भन्नाट किस्सा

VIDEO: '...अन् मी थेट तलावात' वीणा जगतापने सांगितला आपल्या काश्मीर ट्रीपचा भन्नाट किस्सा

अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी    (Bigg Boss Marathi)  फेम वीणा जगतापने  (Veena Jagtap) तिच्या काश्मीर ट्रीपचा भन्नाट किस्सा शेअर केला आहे.

अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) फेम वीणा जगतापने (Veena Jagtap) तिच्या काश्मीर ट्रीपचा भन्नाट किस्सा शेअर केला आहे.

अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) फेम वीणा जगतापने (Veena Jagtap) तिच्या काश्मीर ट्रीपचा भन्नाट किस्सा शेअर केला आहे.

मुंबई, 13 जानेवारी-   मराठी मालिका असो किंवा रिएलिटी शो प्रेक्षक नेहमीच त्याचा मनमुराद आस्वाद घेत असतात. नुकताच झी मराठीवर 'हे तर काहीच नाय'   (He Tar Kahich Nay)  हा विनोदी शो आपल्या भेटीला आला आहे. यामधील आपल्या लाडक्या कलाकारांचे विनोदी किस्से ऐकून प्रेक्षक लोटपोट होतात. यामध्ये आता अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी    (Bigg Boss Marathi)  फेम वीणा जगतापने  (Veena Jagtap)   हजेरी लावली आहे. तिच्या काश्मीर ट्रीपचा भन्नाट किस्सा शेअर केला आहे. पाहूया वीणा नेमकं काय म्हणाली.

अभिनेत्री वीणा जगताप मालिका आणि बिग बॉस मराठीमधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. चाहते नेहमीच तिला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असतात. वीणा जगतापने नुकतंच 'हे तर काहीच नाय' या झी मराठीवरील रिएलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये वीणाने असं काही सांगितलं की, सर्वच पोट धरून हसू लागले. नुकताच या शोचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये वीणा जगताप, सुव्रत जोशी,बुधन कडू आणि स्पृहा वरद या कलाकारांनी हजेरी लावलेलं दिसून येत आहे. या कलाकारांनी आपल्यासोबत घडलेल्या काही हास्यास्पद घटनांचा याठिकाणी खुलासा केला आहे.

या नवीन प्रोमोमध्ये वीणा जगताप आपल्यासोबत घडलेल्या एका मजेशीर गोष्टीबदल सांगत आहे. वीणा जगतापसोबत हा किस्सा तिच्या काश्मिर ट्रिप दरम्यान घडला होता. याबद्दल सांगताना वीणा म्हणते, 'मी काही दिवसांपूर्वी माझ्या आई आणि मावशीसोबत काश्मीरला गेले होते. आम्ही तेथे पोहोचलो आणि त्याच क्षणी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे आम्ही आधी काही ठिकाणी विरंगुळा करायचा आणि मग हॉटेलवर जायचा निर्णय घेतला. दरम्यान आम्ही त्या रात्री हाऊस बोटवर राहण्याचा निर्णय घेतला. हाऊस बोटपर्यंत पोहोचण्यासाठी शिकाऱ्यामधून जावं लागतं. मी शिकाऱ्यात चढत असताना मला असं जाणवलं की बैठक व्यवस्था ओलसर आहे. त्यामुळे मी त्या वाहकाला म्हटलं. दादा हे तर ओलं आहे. त्यावर ते म्हणाले नाही मॅडम हे फक्त थंड आहे. ओलं अजिबात नाही.

(हे वाचा:'जेव्हा तू सभोवताली असतोस...' हृताने होणाऱ्या नवऱ्यासाठी लिहिली रोमँटिक पोस्ट )

वीणा पुढं म्हणाली, 'परंतु मी आपल्याच हेक्यात त्यांना सांगत होते. नाही मला ओलं अजिबात आवडत नाही. तुम्ही त्यावर काहीतरी टाका. ते ओलंच आहे. त्यावर ते पुन्हा म्हणाले ते ओलं नाहीय ते फक्त थंड आहे. याठिकाणी सर्वच गोष्टी अशा थंड असतात. परंतु मी माझ्या मतावर ठाम होते. आणि तेसुद्धा आपलं म्हणणं सोडत नव्हते. त्यांनतर त्यांनी मला म्हटलं आधी तुम्ही आत या जर तुम्हाला वाटलं की हे खरंच ओलं आहे. तर तुम्ही बसू नका'. वीणा म्हणाली, मी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि मी शिकाऱ्यात चढण्यासाठी तयार झाले. त्यांनी मला हात दिला मी पाऊल शिकाऱ्यात टाकणारच होते की धाडकन त्या तलावात गेले. म्हणजे शिकाऱ्यात चढण्याच्या प्रयत्नात मी तलावात गेले. आई मी वर आले तेव्हा पूर्णपणे ओलीचिंब झाले होते. यावर मला त्या शिकाऱ्यावाल्यानं माझ्याकडे बोट दाखवत म्हटलं, 'मॅडमजी हे असतं ओलं , आणि हे तर फक्त थंड आहे'. हा किस्सा ऐकताच सिद्धूसह सर्वजण मोठमोठ्याने हसू लागतात'.

First published:
top videos

    Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment, Zee Marathi