मुंबई, 13 जानेवारी- आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (Hruta Durgule) होय. अनेक तरुण हृताला आपला क्रश समजतात. परंतु हृताने आपला जोडीदार निवडल्याचं नुकतंच जाहीर केलं आहे. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी साखरपुडा करत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. त्यांनतर आता हृताने आपल्या होणाऱ्या नवऱ्यासाठी खास पोस्ट (Hruta Durgule Insta Post) शेअर केली आहे पाहूया काय आहे ती पोस्ट? अभिनेत्री हृता दुर्गुळेनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळेनं आपल्या इन्स्टाग्रामवर आपला आणि प्रतीक शहाचा फोटो पोस्ट केला आहे. सोबतच या फोटोला रोमँटिक असं कॅप्शन लिहिलं आहे. हृताने लिहिलं आहे, ‘जेव्हा तू भोवताली असतोस तेव्हा आयुष्य खूप छान वाटतं’. असं म्हणत हृताने पुन्हा एकदा प्रतीकवरील आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. हृताने याआधीही अनेक फोटो शेअर केले आहेत. प्रतीक नि हृता आटा सतत सोशल मीडियावर आपलं प्रेम व्यक्त करताना दिसून येतात.
हृता दुर्गुळेनं काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रतीकसोबतच आपला फोटो शेअर करत आपण प्रेमात असल्याची कबुली दिली होती. त्यांनतर सर्वांनाच सुखद धक्का बसला होता. त्यांनतर काहीच दिवसांत हृता आणि प्रतीकने साखरपुडासुद्धा उरकून घेतला. या दोघांच्या साखरपुड्याची अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चाहते या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत होते. हृताने आपल्या साखरपुड्या आधी काहीशी हिंट दिली होती. ती सतत फोटो पोस्ट करून इतके दिवस बाकी असं म्हणत होती. परंतु ती लग्न करणार की साखरपुडा यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर त्यांनी साखरपुडा करत सर्वांनां सरप्राईज दिलं होतं. (हे वाचा: महेश मांजरेकरांचा ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात ) हृता दुर्गुळेनं अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल मीडियावरसुद्धा फारच लोकप्रिय आहे. ती सतत आपल्या पोस्ट शेअर करत असते. चाहत्यांकडून या पोस्टला भरभरून प्रेम मिळत असतं. सध्या तिचे इन्स्टाग्रामवर २.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. हृताने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु ‘फुलपाखरू’ या मालिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेमुळे ती तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली होती. सध्या ती झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत काम करत आहे. ही मालिकासुद्धा प्रचंड लोकप्रिय झाली आहे. प्रतीक शहाबद्दल सांगायचं झालं तर, तो एक दिग्दर्शक आहे. त्याने अनेक हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.

)







