जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Utkarsh Shinde : "काल पर्यंत मला निवांत जेवता यायचं पण आता..."; उत्कर्षनं सांगितला पुण्यातील 'तो' प्रसंग

Utkarsh Shinde : "काल पर्यंत मला निवांत जेवता यायचं पण आता..."; उत्कर्षनं सांगितला पुण्यातील 'तो' प्रसंग

उत्कर्ष शिंदे

उत्कर्ष शिंदे

गायक अभिनेता उत्कर्ष शिंदेनं पुण्यात आलेला अनुभव सर्वांबरोबर शेअर केला आहे. “मूठभर मास अंगावर चढलं” असं उत्कर्षनं म्हटलं आहे. सोबत त्यानं व्हिडीओही शेअर केलाय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,  07 ऑक्टोबर : बिग बॉस फेम अभिनेता उत्कर्ष शिंदे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. बिग बॉसचा तिसरा सीझन गाजवल्यानंतर उत्कर्ष आता अभिनय क्षेत्राकडे वळला आहे. गळ्यात गाणं असताना आता अभिनय क्षेत्रातही उत्कर्ष आपली नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत उत्सक संत चोखामेळांची भूमिका करत आहे. बिझी शेड्यूलनंतर पुण्यात गेला असता उत्कर्षला आलेला अनुभव त्यानं शेअर केलाय. “मूठभर मास अंगावर चढलं”, असं वाटत असल्याचं उत्कर्षनं म्हटलं आहे. उत्कर्ष पेशानं डॉक्टर आहे. मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी अनेक वर्ष उत्कर्ष पुण्यात होता.  पुण्यात असताना दुर्वाअंकुर डायनिंगमध्ये गेल्यावरचा उत्कर्ष जेवण करत असतं. त्याच ठिकाणचा आताचा अनुभव त्यानं शेअर केला आहे. उत्कर्षनं म्हटलंय,  “मेडिकल कॉलेजच्या दिवसा पासून पुण्यात सिटीमध्ये गेलो कि आवर्जून गचागच भरलेल्या दुर्वाअंकुर डाईनिंग हॉल मध्ये जेवायची भलतीच मला आवड. चुटकी वाजून वाडपीला इशाऱ्याने सांगणारे वेटर ,मॅनेजर क्या बात इतकी गर्दी मॅनेज करायची दुर्वाअंकुर डाईनिंग हॉलची एक वेगळीच स्टाईल. फरक इतकाच की काल पर्यंत मला तिथे निवांत जेवता यायचं पण आता तिथे गेलो की पोट तर नेहमी प्रमाणे पोट भरे पर्यंत जेवण तर होतंच पण आता जेवताना तिथे आलेल्या गर्दीतून प्रेम आशीर्वाद कौतुक इतक मिळत की तिथे पोटाची भूक भागतेच पण सोबतच मनः तृप्त होत ते काही औरच असत”. हेही वाचा - Bigg Boss Marathi 4च्या घरात कोण आहे “पप्पू द भांडी घाश्या”? अपूर्वानं साधला निशाणा

जाहिरात

चाहत्यांनी केलं कौतुक उत्कर्षनं पुढे दुर्वांकूरमध्ये भेटलेल्या चाहत्यांचा अनुभव सांगितला. उत्कर्षनं म्हटलंय, “मी जेवत असताना काकू प्रेमाने आल्या खांद्यावर हाथ ठेऊन उत्कर्ष शिंदे ना ?असा प्रश्न विचाराला आणि मी हो म्हणताच .कौतुकाचा अक्षरशः पाऊस माझ्या वर त्यांनी पाडला.  म्हंटलं तर चालेल ना असा विचारताच .तू आमच्या परिवारातील घरातला वाटतोस म्हणून तू जेवतोयेस तरीही तुला जेवत असताना बोलायाला आम्ही आलो.  तू किती उत्तम आहेस,आम्हला आवडतोस तुझ्या साठीच आम्ही बिगबॉस बघायचो. आणि आता तु ज्ञानेश्वर माऊलीतली संत चोखा मेळा भूमिका हि किती सुंदर केलीस अस म्हणत भरभरून कौतुक करत नजरच काढली. मायेने डोक्यावरून हाथ फिरवल आशीर्वाद दिले आणि गेल्या आणि माझं मात्र जेवणा आधीच ते म्हणतात ना “मूठभर मास अंगावर चढलं "

News18लोकमत
News18लोकमत

मायमाप रसिकांकडून मिळत असलेलं प्रेम पाहून उत्कर्षनं शेवटी म्हटलंय,“पदोपदी रसिक माय बापाचं मिळत असलेलं अथांग प्रेम लाभत आहे ह्या पेक्षा एका कलाकाराला आणखीन काय हवं .पोटोबा तृप्त मनः पण तृप्त”.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात