मुंबई, 4 ऑक्टोबर: सध्या सगळीकडे मराठी बिग बॉसच्या नव्या सीझन ( Bigg Boss Marathi 3) जोरदार चर्चा रंगली आहे. बिग बॉस हा असा शो आहे ज्यामध्ये भांडणे तर होतातच पण अनेकांचे प्रेम देखील या घऱात फुलेले पाहिले आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात देखील अशीच एक लव्हबर्ड जोडी होती ती घऱात चर्चेत होते पण घराबाहेर देखील त्यांच्या प्रेमाची चर्चा होती. ही जोडी म्हणजे दुस-या पर्वातील विजेता शीव ठाकरे आणि वीणा जगताप यांची (Shiv Thakare And Veena Jagtap) आहे. सध्या सोशल मीडियावर या जोडीचे ब्रेकअप (BREAKUP) झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. वीणा आणि शिवला बऱ्याचवेळा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून या जोडीचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगल्याची दिसत आहे. कारणही तसेच आहे कारण वीणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये वीणाने तिच्या हातावरचा शिवच्या नावाचा टॅटू हटवल्याचे दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांनी विविध तर्क लावण्यास सुरूवात केली आहे. वाचा; Mumbai Drug Bust LIVE Updates:NCB नं 13 ऑक्टोबर पर्यंत मागितली होती आर्यनची कस्टडी, पण कोर्टाने 7 तारखेपर्यंत दिली कस्टडी अभिनेत्री वीणा जगताप आणि अभिनेत्री अक्षया देवधर काही दिवसांपूर्वीच लडाख ट्रीपवर गेल्या होत्या. तेव्हा तिथले विविध फोटोशूट आणि रील व्हिडिओचा नजराणा त्यांनी चाहत्यांसमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला होता. पण यात वीणाचा एक व्हिडिओ पाहून चाहत्यांना प्रचंड आश्चर्याचा धक्का बसला आहे. तो म्हणजे, वीणाने आपल्या हातावर काढलेला शीवच्या नावाचा टॅटू मॉडीफाई केल्याचे दिसत आहे. त्यावर विणाने आता एका झाडाच्या पानाचा आकार गोंदवून घेतल्याचे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे.
यावरून नेटकऱ्यांनी शिव आणि वीणाचा ब्रेकअप झाल्याचा तर्क लावला आहे. मात्र शिव आणि वीणा यांच्याकडून यावर अधिकृतपणे कोणतेच स्टेटमेंट आलेले नाही. तर या दोघांच्या इन्स्टाग्रामवरसुधदा एकमेकांसोबतचे फोटो कायम आहेत. तसेच शिवच्या हातावर देखील वीणाच्या नावाचा टॅटू असल्याचे काही सोशल मीडियावरचे फोटो पाहिल्यानंतर लक्षात येते.