मुंबई, 17 जुलै- ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सीजन प्रचंड लोकप्रिय ठरला होता. या सीजनमधील कलाकार स्पर्धकानांसुद्धा प्रचंड प्रसिद्ध मिळाली होती. त्यामुळेच आजही हे कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री करत तुफान राडा करणारा स्पर्धक म्हणजे अभिनेता आदिश वैद्य होय. आदिशला शोमध्ये प्रचंड पसंती मिळाली होती.जरी तो जास्त काळ या घरामध्ये राहिला नसला तरी त्याला बिग बॉसच्या घरात परत आणण्याची मागणी केली जात होती. आज या अभिनेत्याने एक खास पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाहूया काय आहे नेमकी पोस्ट. आदिश वैद्य सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत आपल्या नवनवीन पोस्ट शेअर करत, चाहत्यांची वाहवाह मिळवत असतो. आदिश वैद्यने फारच कमी वयात आणि कमी कालावधीत आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. त्यामुळेच त्याचा एक खास चाहतावर्ग निर्माण झाला आहे. या चाहत्यांना नेहमीच त्याच्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्याबाबत जाणून घ्यायला आवडतं. आज अभिनेत्याने पोस्ट करत आपल्या करिअरच्या खास आठवणी शेअर केल्या आहेत. कारणही तितकंच खास आहे. आज आदिश वैद्यला अभिनय क्षेत्रात येऊन तब्बल 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळातील गोड-कटू आठवणी अभिनेत्याने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. आदिश वैद्य पोस्ट- ‘एक अभिनेता म्हणून आज तब्बल 7 वर्षे पूर्ण झाली. या गोष्टीवर विश्वास बसत नाहीय.क्रिकेटपटू होण्यापासून, कॉर्पोरेट नोकऱ्या शोधणे त्यातली एखादी मिळवणे. परंतु हे सर्व मागे टाकत स्वतः ला खरंच काय आवडतं हे शोधून काढणं. आणि एक अभिनेता म्हणून पुन्हा नव्याने सुरुवात करणं हे खरंच एखाद्या रोलर कॉस्टर राईडसारखं आहे. प्रत्येक दिवस हा एक नवी सुरुवात आहे आणि हा प्रत्येक दिवस अजून काही शिकण्यासाठी आणि इतरांवर प्रेम करण्यासाठी आहे, हे आपल्याला समजणं म्हणजे एखाद्या आशिर्वादासारखं आहे. आयुष्यात कितीही चढउतार आले, तरी डगमगू नका. आशा गमावू नका. स्वतःला नेहमी एक गोष्ट सांगता राहा, जर तुम्ही स्वतः स्वतःची मदत नाही केली तर जगातील कोणताही व्यक्ती तुमची मदत करु शकत नाही. माझ्या या 7 वर्षातील रोमहर्षक प्रवासाची एक झलक या 47 सेकंदात तुमच्यासोबत शेअर करत आहे’.
**(हे वाचा:** Akshaya Naik: ‘लग्नासाठी मुलगा नाही’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षया नाईकने सांगितली मनातली गोष्ट ) आदिशने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘कुंकू टिकली आणि टॅट्टू’ ही त्याने अभिनेता म्हणून केलेली पहिली टीव्ही मालिका आहे. पंचवीशीतला तरुण आणि देखणा चेहरा म्हणून आदिश मराठी मालिकेतून लोकप्रिय झाला होता. ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेत देखील तो महत्वाच्या भूमिकेत दिसला होता. यासोबतच जिंदगी नॉट आउट, बॅरिस्टर बाबू, गुम है किसीं के प्यार में, या हिंदी तसेच मराठी मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. गुम है किसीं के प्यार में या मालिकेत त्याने मोहितचे पात्र साकारले होते. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. बिग बॉस मराठीच्या घरात येण्यासाठी त्याने या मालिकेतून एक्झिट घेतली होती.