मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Akshaya Naik: 'लग्नासाठी मुलगा नाही', 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईकने सांगितली मनातली गोष्ट

Akshaya Naik: 'लग्नासाठी मुलगा नाही', 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईकने सांगितली मनातली गोष्ट

 ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतून ‘लतिका’ म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईक घराघरात पोहोचली आहे. तिचा खास चाहतावर्ग निर्माण झाला आहे. या चाहत्यांना तिच्याबाबत प्रत्येक लहान-लहान गोष्टी जाणून घ्यायला आवडतं.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 17 जुलै-  ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतून ‘लतिका’ म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईक घराघरात पोहोचली आहे. तिचा खास चाहतावर्ग निर्माण झाला आहे. या चाहत्यांना तिच्याबाबत प्रत्येक लहान-लहान गोष्टी जाणून घ्यायला आवडतं. अक्षयासुद्धा आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रत्येक अपडेट्स शेअर करत असते. नुकतंच अभिनेत्रीने आपल्या प्रेमाचा खुलासा करत, लग्नाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

स्टार प्रवाहवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेतील लतिका सतत चर्चेत असते. तसेच खऱ्या आयुष्यात लतिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईकदेखील चर्चेत असते. लतिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत चाहत्यांसाठी आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.अनेकवेळा अभिनेत्रीला बॉडी शेमिंगचादेखील अनुभव आला आहे. मात्र या सर्वांकडे दुर्लक्ष करत अक्षया नेहमीच बिनधास्त जगत असते. इतकंच नव्हे तर ती अनेकांना आयुष्याकडे या अंदाजाने बघण्याची प्रेरणा देत असते.

दरम्यान अभिनेत्रीची एक पोस्ट चर्चेत आली आहे. अक्षया नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत असते. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'आस्क मी एनिथिंग' सेशन ठेवलं होतं. यादरम्यान चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले होते. अभिनेत्रीनेसुद्धा त्यांना आपल्या हटके अंदाजात उत्तर देत सर्वांचं मन जिंकलं आहे. त्यातील एका चाहत्याने अक्षयाला थेट लग्नाबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला अक्षयाने आपल्या नेहमीच्या मजेदार अंदाजात उत्तर दिलं आहे.

(हे वाचा: Jeev Majha Guntala: 'जीव माझा गुंतला'चा हिंदी रिमेक भेटीला; पाहा कोण साकारणार अंतरा-मल्हार )

'लग्न कधी करतेस' असा प्रश्न विचारला असता अक्षयाने म्हटलं, 'लग्नासाठी मुलगा नाहीय. त्यात मी मनाने अदिती द्रविडची आहे. असं मजेशीर उत्तर देत अभिनेत्रीने सर्वांचंच मन जिंकलं. वास्तविक अदिती द्रविड आणि अक्षया सुंदरामध्ये एकत्र काम करतात.या दोघींची अतिशय घट्ट मैत्री आहे. त्या नेहमीच एकमेकींसोबत मजामस्ती करतांना दिसून येतात. त्यामुळे अभिनेत्रीने या उत्तरातून आपल्या मैत्रिणीसोबतच आपलं हटके बॉन्डिंग शेअर केलं आहे. मात्र अक्षयाचा खरा राजकुमार कोण आहे हे पाहण्यासाठी आपल्याला अजूनही प्रतीक्षा करावी लागेल.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Tv actress