मुंबई, 10 जुलै- ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karate) ही मालिका सध्या खूपच लोकप्रिय ठरत आहे. मालिकेत दररोज येणारे नवे ट्वीस्ट चाहत्यांना आकर्षित करून घेत आहेत. मालिकेतील अरुंधतीचा (Arundhati) स्वाभिमान आणि संजनाचा (Sanjana) हट्ट यामुळे येणारे नवनवीन टर्न चाहत्यांना खुपचं आवडत आहेत. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये अरुंधतीने थेट संजनाला धमकीचं दिली आहे. पाहूया नेमकं काय झालं आहे.
View this post on Instagram
स्टार प्रवाहवर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रसारित होते. या मालिकेने आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. या मालिकेला दर्शकांची मोठी पसंती मिळते. त्यामुळे मालिका टीआरपीच्या रेसमध्येसुद्धा पुढे दिसून येते. मालिकेत अरुंधतीची जागा संजना घेण्याचा प्रयत्न करत आहे. काही प्रमणात ती यात यशस्वीसुद्धा झाली आहे. आत्ता अरुंधतीच्या घरामध्ये ती येऊन राहू लागली आहे. आणि अरुंधतीने हे घर सोडलं आहे. मात्र मालिकेमध्ये लवकरच एक नवा ट्वीस्ट येणार असल्याचं दिसत आहे.
(हे वाचा:बाळंतपणानंतर वजन कसं करायचं कमी? धनश्रीने दिल्या After Pregnancy टिप्स )
नुकताच मालिकेचा एका नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये संजना अरुंधतीला आपल्या आणि अनिरुद्धच्या लग्नाची पत्रिका दाखवत आहे. म्हणजेच संजना अरुंधतीच्या पतीसोबतचं आपला संसार थाटायला चालली आहे. तिच्या मुळेच अरुंधती आणि अनिरुद्धच्या नात्यात दुरावा आला आहे. आणि हे प्रकरण चक्क घटस्फोटपर्यंत पोहोचलं आहे. या दोघांनी घटस्फोटसुद्धा घेतला आहे. आणि आत्ता अनिरुद्ध संजनाशी लग्न करत आहे.
(हे वाचा: “म्हातारी तुझी आई असेल”; संतापलेल्या कविता कौशिकनं ट्रोलर्सची बोलती केली बंद )
याच लग्नाची पत्रिका संजना अरुंधतीला दाखवून तिला खिजवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यामध्ये अरुंधतीचं नवं रूप पाहायला मिळत आहे. आई अप्पांना आणि माझ्या मुलांना काही त्रास होतं आहे, हे जेव्हा माझ्या कानावर येईल त्या क्षणी मी या घरात परत येईन, आणि तुझ त्याच्याशी लग्न झालं आहे. आणि माझा घटस्फोट झाला आहे. हे मी विसरून जाईन अशी चक्क धमकीच अरुंधतीने संजनाला दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment, Tv actors, TV serials