मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बाळंतपणानंतर वजन कसं करायचं कमी? धनश्रीने दिल्या After Pregnancy टिप्स

बाळंतपणानंतर वजन कसं करायचं कमी? धनश्रीने दिल्या After Pregnancy टिप्स

‘तुझ्यात जीव रंगला’ (Tuzat Jiv Rangla) फेम अभिनेत्री धनश्री काडगावकरने (Dhanshri Kadgaonkar) काही महिन्यांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ (Tuzat Jiv Rangla) फेम अभिनेत्री धनश्री काडगावकरने (Dhanshri Kadgaonkar) काही महिन्यांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ (Tuzat Jiv Rangla) फेम अभिनेत्री धनश्री काडगावकरने (Dhanshri Kadgaonkar) काही महिन्यांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

मुंबई, 10 जुलै- ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tuzat Jiv Rangla) फेम अभिनेत्री धनश्री काडगावकरने (Dhanshri Kadgaonkar) काही महिन्यांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. डिलिव्हरीच्या काही दिवसांनंतरचं धनश्रीने आपलं वजन कमी करायला सुरुवात केली आहे. कारण प्रेग्नेन्सीमध्ये तिचं वजन खुपचं वाढलं आहे. मात्र प्रेग्नेन्सीतील वजन कमी करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात आणि किती मेहनत घ्यावी लागते. याबद्दल धनश्रीने सांगितलं आहे. धनश्रीने एक्सरसाईजचा एक व्हिडीओ शेयर करत प्रेग्नेन्सीनंतर वजन कमी (After Pregnancy Weight Loss) करणाऱ्या सर्वच महिलांना एक आत्मविश्वास दिला आहे.

आजकालच्या महिलांना तसेच अभिनेत्रींना आपली फिगर मेंटेन करणं खूप महत्वाचं वाटतं. आणि त्यासाठी त्या वाटेल ते कष्ट घ्यायला तयार असतात. मात्र प्रेग्नेन्सीमध्ये महिलांच्या शरीरात अनेक बदल घडून येतात. त्यांचं वजन मोठ्या प्रमणात वाढत. आणि अशावेळी महिलांना अधिक काळजी वाटू लागते. मात्र चिंता करायची काहीच गरज नाही. कारण याकाळात वजन थोडं मंदगतीने कमी होईल, मात्र दररोजच्या प्रयत्नांनी लवकरच ते साध्य ही करता येईल.

(हे वाचा: Fashion Disaster: आलियाची फॅशन ठरली फ्लॉप; कॅमेरात कैद झाले विचित्र फोटो)

अशाच मातांना प्रोत्साहन देणारी ही धनश्रीची पोस्ट आहे. धनश्रीने सुद्धा म्हटलं आहे, की या काळात माझं फक्त 1 किलो वजन कमी झालं आहे. मात्र आत्ता नवी जिद्द आणि नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, पाहूया धनश्रीने काय म्हटलं आहे, ‘कबीर ज्या दिवशी जन्मला त्या दिवसा पासून आत्ता पर्यंत 1 kg वजन फक्त कमी झालं आहे..नाही, मला याचं वाईट वाटतंय असं नाही.. पण माझ्या सारख्या अनेक असतील, कदाचीत त्यांना हे वाचून आपली पण तर सेमच कंडीशन आहे असं वाटेल..

हो पण inchloss नक्की च झाला..आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम करण्याची कॅपसिटी वाढली, कॉन्फीडन्स वाढला..अफ्टर डिलिव्हरी  खूप गोष्टी दुखत असतात, त्या हळू हळू कमी झाल्या’.

(हे वाचा: ही ‘Choti Kangana’ आहे तरी कोण? Photo पाहून बॉलिवूडची क्वीनही चक्रावली)

धनश्री सध्या आपल्या वेट लॉससाठी खुपचं मेहनत घेत आहे. ती सतत सोशल मीडियावर आपले एक्सरसाईजचे व्हिडीओ शेयर करत असते. तसेच प्रेग्नेन्सीमधील आपले अनुभव शेयर करून आपल्यासारख्या अनेक महिलांना आत्मविश्वास आणि प्रोत्साहन देत असते.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment