मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss Marathi: 'सोनाली बाहेर काढेन...'सोनालीवर भडकले महेश मांजरेकर काय आहे कारण, पाहा VIDEO

Bigg Boss Marathi: 'सोनाली बाहेर काढेन...'सोनालीवर भडकले महेश मांजरेकर काय आहे कारण, पाहा VIDEO

दररोज हा शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. त्यातच बिग बॉसची चावडी असेल तर काय सांगायलाच नको. होस्ट महेश मांजरेकर   (Mahesh Manjrekar)   ज्या पद्धतीने चुकलेल्या स्पर्धकांना बोल लावतात ते पाहायला प्रत्येकालाच रंजक वाटतं.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बहुचर्चित पण तितकाच विवादित शो म्हणून बिग बॉसला ओळखलं जातं. सध्या बिग बॉस मराठीचा   (Bigg Boss Marathi)   तिसरा सीजन सुरु आहे. हा सीजन चांगलाच गाजत आहे. दररोज हा शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. त्यातच बिग बॉसची चावडी असेल तर काय सांगायलाच नको. होस्ट महेश मांजरेकर   (Mahesh Manjrekar)   ज्या पद्धतीने चुकलेल्या स्पर्धकांना बोल लावतात ते पाहायला प्रत्येकालाच रंजक वाटतं. मात्र असं काही झालं आहे. की ते पाहून सोनाली आणि विशालचे चाहते चिंतेत आहेत. पाहूया नेमकं काय घडलं.

नुकताच बिग बॉस मराठीचा एक प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो आज होणाऱ्या चावडीचा आहे. यामध्ये महेश मांजरेकर सोनालीवर  (Sonali Patil)   खेकसताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या या प्रोमोमध्ये होस्ट महेश मांजरेकर विशाल   (Vishal Nikam)  आणि सोनालीला त्यांच्यात नेमकं काय घडत आहे. याबद्दल विचारत आहेत. यावेळी विशाल सोनालीवर आरोप लावताना दिसत आहे. विशाल म्हणतो, सोनाली बोलते एक पण ती तशी नाहीय. ती मला व्हिलन ठरवण्याचा प्रत्यन करत आहे. जे कि तसं नाहीय. यावर सोनाली आक्षेप घेते आणि नोळण्याचा प्रयत्न करते कि, हे चुकीचं आहे, मी तुला व्हिलन ठरवतेय? असा प्रतिप्रश्न ती करते. या दोघांच्या वादविवादात महेश मांजरेकर सोनालीला ओरडतात आणि बिग बॉस मधून बाहेर काढेन अशी तंबीसुद्दा देताना दिसतात.

तसेच विशाल यावेळी सोनालीला म्हणतो, 'तू माईक सोडून माझ्या कानात काय बोललीस? हे तू सांगणार कि मी सांगू? असं म्हणत विशालने आजच्या एपिसोडमध्ये एक मोठं ट्विस्ट आणलं आहे. या प्रोमोमध्ये सोनाली डोक्याला हात लावून प्रचंड रडताना दिसत आहे. या दोघांमध्ये असं नेमकं काय घडलं कि त्यांना चावडीवर एकेमकांविरुद्ध उभं केलं. हे आजच्या भागातच आपल्याला कळेल. चाहतेही हे जाणून घेण्यासाठी फारच उत्सुक झाले आहेत. तसेच सोनाली आणि विशालच्या चाहत्यांना त्यांच्यामध्ये आलेल्या दुराव्याने चिंता वाटत आहे.

(हे वाचा:Bigg Boss Marathi: विकास पाटील ट्विटरवर झाला ट्रेंड; वाचा काय आहे कारण )

गेली काही दिवस बिग बॉसच्या घरात बी टीममध्ये फूट पडत असलेली दिसून येत आहे. पर्वा सोनाली आणि मीनलमध्ये भांडण झालं. त्यांनतर विकास आणि विशालमध्ये भांडण झालं. नंतर सोनाली आणि विकासमध्ये आता पुन्हा सोनाली आणि विशालमध्ये भांडण झालं आहे. त्यामुळे घरातील मैत्रीची समीकरणे बदलताना दिसून येत आहेत. घरात आल्यापासून सोनाली आणि विशालमध्ये एक खास नातं टायर झालं होतं. हे दोघे सतत एकमेकांसाठी लढताना दिसून आले आहेत. तसेच हे दोघे अनेक पर्सनल गोष्टी एकेमकांशी शेअर करताना दिसले आहेत. मात्र आज त्यांच्यामध्ये झालेला तुफान राडा पाहून यांचे चाहते चिंतेत आहेत.

First published:

Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment