Home /News /entertainment /

Bigg Boss Marathi: विकास पाटील ट्विटरवर झाला ट्रेंड; वाचा काय आहे कारण

Bigg Boss Marathi: विकास पाटील ट्विटरवर झाला ट्रेंड; वाचा काय आहे कारण

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) सीजन ३ (Season 3) सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरामध्ये स्वतःच स्थान पक्क करण्यासाठी स्पर्धकांमध्ये मोठी चढाओढ सुरु आहे. त्यामुळे घरात अनेक वादविवाद आणि राडेसुद्धा पाहायला मिळत आहेत. गेली अनेक दिवस घरामध्ये 'दोस्तीत कुस्ती' असं वातावरण दिसून येत आहे. घरातील जय-वीरू समजले जाणारे, विकास आणि विशाल यांच्यामध्ये सतत वाद होत असलेला दिसून येत आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 27 नोव्हेंबर- 'बिग बॉस मराठी'   (Bigg Boss Marathi)  सीजन ३   (Season 3)  सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरामध्ये स्वतःच स्थान पक्क करण्यासाठी स्पर्धकांमध्ये मोठी चढाओढ सुरु आहे. त्यामुळे घरात अनेक वादविवाद आणि राडेसुद्धा पाहायला मिळत आहेत. गेली अनेक दिवस घरामध्ये 'दोस्तीत कुस्ती' असं वातावरण दिसून येत आहे. घरातील जय-वीरू समजले जाणारे, विकास आणि विशाल यांच्यामध्ये सतत वाद होत असलेला दिसून येत आहे.दरम्यान काल दिवसभर ट्विटरवर #viewers with vikaspatil हा हॅश टॅग ट्रेंड होत होता. पाहूया नेमकं काय घडलं होतं.
  View this post on Instagram

  A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

  जस-जसं दिवस वाढत चाललेत तसतसं घरातील वातावरण बदलत चाललेलं दिसून येत आहे.पहिला ए टीम आणि बी टीम असा वाद पाहायला मिळत असे. आता घरातील समीकरणे बदललेली पाहायला मिळत आहेत. एकीकडे बेस्ट फ्रेंड म्हणून वावरणाऱ्या मीरा आणि गायत्री एकमेकींसोबत भांडत आहेत. तर दुसरीकडे जय-वीरू समजले जाणारे विकास पाटील आणि विशाल निकमी हे आपापसांत भांडताना दिसून येत आहेत. हा वाद कॅप्टन्सी टास्कदरम्यान इतका वाढला कि हे दोघे एकमेकांसोबत हातापायीसुद्धा करू लागले होते. विशाल आणि विकासच्या वादविवादांनंतर विकास पाटील सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. नुकताच घरामध्ये कॅप्टन्सी टास्क पार पडला. यावेळी घरातून नॉमिनेशन टास्क जिंकून जय आणि मीरा हे दोन उमेदवार कॅप्टन्सी उमेदवारी साठी पात्र ठरले होते. अशातच घरातील इतर सदस्यांना या दोघांना कॅप्टन्सी मिळवून देण्यासाठी टास्क खेळायचा होता. यावेळी बिग बॉसच्या आदेशानुसार घरात २ टीम करण्यात आल्या होत्या. जयच्या टीममध्ये विशाल आणि मीनल होते. तर मीराच्या टीममध्ये विकास आणि उत्कर्ष होते. तर बाकी सदस्य त्यांना प्रोत्साहन देत होते. दरम्यान टास्क जिंकण्यासाठी विकास आणि विशालने प्राण पणाला लावले होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यावेळी विशालने विकासला टॅकल करत, खाली जमिनीवर पाडलं होतं. तर विकास सुटण्यासाठी धडपड करत होता. मात्र आपल्या फिजिकल स्ट्रेंथच्या जोरावर विशाल यात वरचढ ठरला. त्याने विकासला अजिबात निसटू दिलं नाही. इतकंच नेव्हर तर विकास पाणी प्यायचं आहे म्हणून धडपड बकर्ट होता मात्र विशालने त्याला सोडलं नाही. त्याला टॅकल करूनच पाणी प्यायला दिलं. (हे वाचा:'Bigg Boss Marathi' गर्ल्सचं Reunion; मेघा,सई आणि शर्मिष्ठाने पहिल्या सीजनमध्ये) दरम्यान विशाल आणि विकासमध्ये मोठी शाब्दिक चकमक झाली. यावेळी त्यांनी एकेमकांवर अनेक आरोप केले. विशालने तर चक्क विकासला फट्टू असं म्हटलं तर विकासने विशालला माउलीचं नामस्मरण करतोस तरीखोटं बोलतोस. बंद कर नाव घेणे. फक्त नाव घेऊन काही होत नाही. देवासारखं खेळायलाही हवं असं म्हटलं. तर विशालने तू माझा वापर करून घेतल्याचा आरोप लावला आहे. त्यामुळे यांचा आवड आणखीनच वाढत गेला. टास्क झाल्यांनतर विशाल मीनल आणि सोनालीला म्हणताना दिसला कि, हा पूर्णपणे चुकीचा होता. असं वागला म्हणून हा आज एकटा पडला आहे. तर दुसरीकडे विकास एकटाच सोफ्यावर बसलेला दिसून आला. या सर्व प्रकारानंतर विकासला प्रेक्षकांकडून प्रचंड सपोर्ट मिळत आहे. विकासला प्रेक्षक आम्ही तुझ्या सोबत असल्याचं सांगत आहेत. त्यामुळेच काल दिवसभर ट्विटरवर विकास पाटील ट्रेंड करत होता. मराठी बिग बॉस सीजन ३ चा हा पहिला स्पर्धक आहे, जो इतक्या प्रचंड प्रमाणात ट्विटरवर ट्रेंड झाला आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment

  पुढील बातम्या