मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Akshay Kelkar: किरण मानेंपेक्षा कमी नव्हता अक्षय केळकरचा थाट; ट्रॉफी घेऊन घरी झालं जल्लोषात स्वागत; आता समोर आला VIDEO

Akshay Kelkar: किरण मानेंपेक्षा कमी नव्हता अक्षय केळकरचा थाट; ट्रॉफी घेऊन घरी झालं जल्लोषात स्वागत; आता समोर आला VIDEO

अक्षय केळकर

अक्षय केळकर

'बिग बॉस मराठी' चा चौथा सीजन नुकतंच पार पडला. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाचा सीजनसुद्धा धमाकेदार आणि अनपेक्षित ट्विस्ट आणि टर्न्स असलेला ठरला. मात्र या सीजनवर अनेकांनी टीकासुद्धा केल्या. अभिनेता-स्पर्धक अक्षय केळकर या सीजनचा विजेता ठरला.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 17 जानेवारी- 'बिग बॉस मराठी' चा चौथा सीजन नुकतंच पार पडला. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाचा सीजनसुद्धा धमाकेदार आणि अनपेक्षित ट्विस्ट आणि टर्न्स असलेला ठरला. मात्र या सीजनवर अनेकांनी टीकासुद्धा केल्या. अभिनेता-स्पर्धक अक्षय केळकर या सीजनचा विजेता ठरला. तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर या पर्वाची उपविजेता ठरली. सीजन संपल्यानंतरसुद्धा हे स्पर्धक प्रचंड चर्चेत आहेत. नुकतंच किरण माने यांचं त्यांच्या सातारा या मूळ गावी दणक्यात स्वागत करण्यात आलं होतं. तर आता या पर्वाचा विजेता ठरलेल्या अक्षय केळकरच्या घरीसुद्धा त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अभिनेत्याने आता हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

यंदाच्या सीजनमध्येसुद्धा स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस दिसून आली. शोमध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक स्पर्धकामध्ये चढाओढ सुरु होती. दरम्यान अमृता धोंगडे, अपूर्वा नेमळेकर, किरण माने, अक्षय केळकर आणि राखी सावंत हे टॉप फाईव्हमध्ये पोहोचले होते. यामध्ये महाअंतिम सोहळ्यादिवशी किरण माने, अमृता धोंगडे आणि राखी सावंत बाहेर पडले. आणि अक्षय केळकर आणि अपूर्वा नेमळेकर टॉप २ मध्ये सहभागी झाले होते. यामध्ये अपूर्वाचा पराभव करत अक्षय केळकर महाविजेता ठरला होता. अक्षय केळकरने महाविजेता ठरतच भावुक होत आपलं आनंद व्यक्त केला होता.

(हे वाचा:Apurva Nemlekar: बिग बॉस संपताच अपूर्वा नेमळेकरचं महेश मांजरेकरांबाबत धक्कादायक विधान; म्हणाली, त्यांच्या सूचना..' )

दरम्यान आता अक्षय केळकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अक्षयसाठी फारच खास आहे. कारण हा व्हिडीओ त्याच्या घरातील स्वागताचा आहे. विजेता बनल्यानंतर अक्षय जेव्हा पहिल्यांदाच आपल्या घरी ट्रॉफी घेऊन पोहोचला तेव्हाच हा व्हिडीओ आहे. यामध्ये अक्षय आणि त्याच्या कुटूंबाचा आनंद ओसंडून वाहत आहे. तसेच अक्षयचे शेजारी आणि चाहतेसुद्धा त्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याच्या स्वागतासाठी जमलेलं दिसून येत आहेत.

अक्षय केळकरने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये जमलेले त्याचे चाहते त्याच्यासोबत सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी अतिशय उत्सुक असल्याचं दिसून येत आहेत. तसेच घरी पोहोचताच अक्षयच्या आईने आरतीचं ताट घेऊन आपल्या लेकाला ओवाळलेलं दिसत आहे. अभिनेत्याच्या चेहऱ्यावरचा आनंद यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यावर अक्षयला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काही लोक अक्षयचं कौतुक करत आहेत. तर काही नेटकरी त्याच्यावर टीका करत आहेत.

बिग बॉस मराठीचा चौथा सीजन जिंकत अक्षय केळकरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या पर्वाचा विजेता बनलेल्या अक्षयला बिग बॉसची लखलखीत ट्रॉफी आणि 15 लाख 55 हजार रुपये बक्षीस मिळालं आहे. तर या शोच्या महाअंतिम सोहळ्यामध्ये अभिनेत्री राखी सावंत 9 लाख रुपयांची रक्कम घेत शोमधून बाहेर पडली होती. त्यांनतर बिग बॉसमध्ये टॉप 4 स्पर्धक उरले होते. ज्यामधून अक्षय केळकर विजेता ठरला.

First published:

Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment