जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'लोकांना वाटेल मी खोटं बोलतोय, पण...' बिग बॉस मराठी फेम विशाल निकमचं सौंदर्यासोबत ब्रेकअप

'लोकांना वाटेल मी खोटं बोलतोय, पण...' बिग बॉस मराठी फेम विशाल निकमचं सौंदर्यासोबत ब्रेकअप

'लोकांना वाटेल मी खोटं बोलतोय, पण...'  बिग बॉस मराठी फेम विशाल निकमचं सौंदर्यासोबत ब्रेकअप

‘बिग बॉस मराठी 3’ (Bigg Boss Marathi 3 ) च्या घरात अभिनेता विशाल निकमनं ( Vishhal Nikam ) त्याच्या सौंदर्यासोबतच्या (Saundarya) नात्याची घोषणा केली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 एप्रिल- ‘बिग बॉस मराठी 3’ (Bigg Boss Marathi 3 ) च्या घरात अभिनेता विशाल निकमनं ( Vishhal Nikam ) त्याच्या सौंदर्यासोबतच्या (Saundarya) नात्याची घोषणा केली होती. तेव्हापासून विशाल निकम चांगलाच चर्चेत आला होता. तेव्हा विशालने सांगितले होते की, माझं सौंदर्यावर प्रेम आहे. याशिवाय घराच्या बाहेर आल्यानंचर देखील त्यानं मीडियाला सांगितले होते की, मी सौंदर्यावर प्रेम करतो आणि सर्वांना त्यांच्या लग्नाला आमंत्रित करण्याचे माझं स्वप्न असल्याचे देखील त्यानं सांगितलं होतो. पण आता परिस्थिती बदलली आहे, विशाल निकम आणि त्याची मैत्रीण सौंदर्या यांचे अधिकृतपणे (  vishhal nikam breakup saundarya ) ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे. ईटाईम्सनं याबद्दल वृत्त दिलं आहे. ETimes TV शी एका खास चॅटमध्ये विशाल निकमने आपल्या सौंदर्यासोबतच्या नात्याविषयी सांगितले की, सौंदर्यासोबतचे त्याचे नाते बिग बॉस मराठी 3 नंतर खूप काळ चालू शकले नाही म्हणून आमचं ब्रेकअप झालं. विशाल पुढे म्हणाला की, माझं सौंदर्यासोबत ब्रेकअप झालं आहे. लोक म्हणतील की, मी तिच्यासोबतच्या माझ्या नात्याबद्दल खोटं बोलत होतो पण आमचं नीतं खरं होतं. सौंदर्या माझ्या आयुष्यात होती पण आता मी सिंगल आहे आणि सध्या माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्याने यावेळी सांगितले. वाचा- मराठमोळ्या ‘चंद्रा’चा मनमोहक अंदाज, काळ्या साडीत करतेय कहर विशाल पुढे म्हणाला की, बिग बॉस मराठीनंतर दोघांच्या काहीच चांगले घडले नाही आणि त्यामुळंच सौंदर्यासोबतचं नातं संपवावे लागले. बिग बॉस मराठीनंतर गोष्टी बदलल्या. मी जिथे जिथे जातो तिथे लोक मला सौंदर्याबद्दल विचारतात आणि म्हणूनच मी सगळ्यांना हे सांगण्याचा निर्णय घेतला की आता आमच्यात काहीच नाही. खरं तर हे माझ्यासाठी खूपच कठीण आहे. मला माहित आहे की, लोक आता माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. मी खोटे बोलत आहे असं लोकांना वाटू शकते. पण मी खोट बोलत नाही आमचं नातं खर होत मात्र आता आमच ब्रेकअप झालं आहे. ब्रेकअपनंतर आता मी नव्याने माझ्या आयुष्याला सुरूवात केली आहे. मी माझ्या आयुष्यात आनंदाने पुढे जात असल्याचे विशाल निकमनं यावेळी सांगितलं. वाचा- अभिज्ञाच्या आयुष्यात ‘आहो’ची जागा घेतली या व्यक्तीनं, फोटो पोस्ट करत म्हणाली…. बिग बॉसच्या घरात लव्हलाइफबद्दल मोठा खुलासा सांगलीचा विशाल निकम बिग बॉस मराठी तिसऱ्या (bigg boss marathi 3) सिजनचा महाविजेता ठरला आहे. विशाल निकम (vishal nikam) बिग बॉसच्या घरात असताना सोनाली पाटीलसोबतच्या मैत्रीमुळे चर्चेत होता. ज्यावेळी त्याची आई व बहीण त्याला घरात भेटण्यास आल्या, तेव्हा त्याने त्याच्या लव्हलाइफबद्दल मोठा खुलासा केला होता. आईने सौंदर्याविषयी सांगितले की, तिचा फोन आला होता. यानंतर विशाल निकम खुश झाला होता.

जाहिरात

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर विशालनं अनेक सदस्यांची भेट घेतली. यानंतर त्याला एका मुलाखतीत सौंदर्याविषयी विचारण्यात आलं. तेव्हा तो म्हणाला की, घरातून बाहेर आल्यानंतर मला शुभेच्छा देण्यासाठी तिचा फोन आला होता. घरात असल्याने आणि त्याआधी सहा महिने आमचे काही बोलणे झाले नव्हते. मात्र ती मला बघत होती, हे मला समजले आहे. त्यामुळे सर्व गोष्टी जेव्हा स्पष्ट होतील, तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेन, असंही विशाल निकम म्हणाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात