मुंबई, 05 मे, मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे (abhidnya bhave) सध्या मनोरंजन सृष्टीतील एक ओळखीचा चेहेरा बनली आहे. अनेक मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारूनसुद्धा प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम दिलं आहे. पडद्यावर व्हिलन असणारी अभिज्ञा रिअल लाईफमध्ये मात्र एक सुपरवुमन आहे. कारण आपला पती कॅन्सरशी झुंज देत असताना (mehul pai suffering cancer) ती खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी आहे. अभिज्ञाने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट तर चर्चेत आलीच आहे शिवाय यावर काही सेलेब्स कमेंट करत आहेत ज्या सर्वांचे लक्षवेधून घेत आहेत. अभिज्ञा भावे इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे की, माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,आई तुझ्यावर खूप प्रेम करते…तिची ही पोस्ट नेमकी कुणासाठी आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तिची ही पोस्ट तिच्या आहोडी…साठी आहे. तुम्हाला वाटलं असेल नवऱ्यासाठी पण नाही ओ…तिची ही पोस्ट तिच्या लाडक्या कुत्र्यासाठी आहे. तिनं तिच्या डॉगीसोबतचे फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ती तिच्या कुत्र्यालाच आहोडी म्हणते. अनेक सेलेब्सनी कमेंट करत याबद्दल सांगितलं देखील आहे. वाचा- राणा-अंजलीच्या नात्याला वहिनीसाहेबांचा होकार, ‘तुझ्यात जीव रंगला’ ची टीम एकत्र चाहत्यांसह सेलेब्सकडून अभिज्ञा भावेच्या या पोस्टवर कमेंटचा वर्षाव होत आहे. यावर अभिनेता सौरभ गोखले याने कमेंट करत म्हटलं आहे की,दादर माहीम परिसरातल्या समस्त श्वानसुंदरीच्या दिलांची धडकन, श्वानतरुण मंडळाचे मार्गदर्शक, भुंकसम्राट ‘अहोदादा पै’ यांना प्रकटदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!!शुभेच्छुक- मफीनमावशी, मिनिदादा, मायलोआप्पा, विमझीताई आनी समस्त गोखले परिवार !! अनेकांनी वाढदिवासच्या शुभेच्छा आहो तर कुणी आहोडी म्हटलं आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. वाचा- अभिनेत्रीच्या कुटुंबात नवीन सदस्याची एंट्री, फोटो पोस्ट करत म्हणाली….. मराठीत मनोरंजन विश्वात अनेक कलाकार आहेत जे पाळीव प्राण्याचं पालन करताना दिसतात. मानसी नाईकला तर कॅट मॉम म्हणून ओळखलं जातं. शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सई लोकुर, सई ताम्हणकर, जुई गडकरी याचं देखील प्राणी प्रेम अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिसून आलं आहे. वाचा- ‘वाहवा आणि डोळ्यातलं पाणीसुद्धा’ इंदौरकरांच्या प्रेमानं भारावली मधुराणी प्रभुलकर अभिज्ञा सध्या झी मराठीवरील तू तेव्हा तशी मालिकेत पुष्पवल्लीची नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे. भूमिका जरी नकारात्मक असली तरी प्रेक्षक तिच्यावर भरभरून प्रेम करताना दिसतात.
अभिज्ञा भावेचे मेहुलची लव्हस्टोरी फिल्मी आहे.अभिज्ञा आणि मेहुल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. 15 वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखायचे. मात्र कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला होता. काही दिवसांनी हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यातली मैत्री पुन्हा फुलत गेली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. अभिज्ञाप्रमाणे मेहुलचा देखील घटस्फोट झाला असल्यानं दोघांनीही त्यांच्या नात्याला लग्नात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 6 जानेवारी 2021 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली .अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे या दोघांच्या लुकनी सर्वांचे लक्ष वेधले होते.अभिज्ञाचा पती मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या 12 वर्षांपासून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.

)







