मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शिल्पा शेट्टीच्या मुलाने मीडियासमोर मास्क काढण्यास दिला नकार, मग झालं असं..

शिल्पा शेट्टीच्या मुलाने मीडियासमोर मास्क काढण्यास दिला नकार, मग झालं असं..

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीसाठी (Shilpa Shetty) यंदाचे वर्ष काहीसे चढ- उताराने भरलेले राहिले आहे. नुकतीच ती तिच्या दोन मुलांसोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाली.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीसाठी (Shilpa Shetty) यंदाचे वर्ष काहीसे चढ- उताराने भरलेले राहिले आहे. नुकतीच ती तिच्या दोन मुलांसोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाली.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीसाठी (Shilpa Shetty) यंदाचे वर्ष काहीसे चढ- उताराने भरलेले राहिले आहे. नुकतीच ती तिच्या दोन मुलांसोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाली.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 30 डिसेंबर-​ बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीसाठी (Shilpa Shetty) यंदाचे वर्ष काहीसे चढ- उताराने भरलेले राहिले आहे. पती राज कुंद्राला (Raj Kundra ) पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक झाल्यानंतर तिनं ज्यप्रमाणे घर, मुल याचा सांभाळ केला खरच कौतुकास्पद आहे. काही लोकांनी राज कुंद्रावरून शिल्पावर अनेक आरोप केले. मात्र शिल्पाने याचा सामान संयमाने केला. या काळात ती सोशल मीडियावर देखील सक्रीय होती. आता राज कुंद्रा जामीनावर बाहेर आला आहे. यानंतर ती घऱच्यांसोबत देवदर्शन करताना दिसली. ख्रिसमसनिमित्त पुन्हा एकदा ती एकदा संपूर्ण कुटुंबासह सुट्टीसाठी मसुरीला रवाना झाली आहे.

मुलाने मास्क काढण्यास दिला नकार

मसुरीत सुट्टीचा आनंद घेतल्यानंतर शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) मुंबईत परतली आहे. ती वियान आणि समिषा (Viyan Samisha) या दोन्ही मुलांसोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी शिल्पा शेट्टीनेही पापाराझींच्या सांगण्यावरून तिचा मास्क काढला. मात्र तिचा मुलगा विआनने मास्क काढण्यास नकार दिला. यानंतर वियानने मास्क काढला आणि हसत हसत कॅमेऱ्याकडे पाहिलं. यावेळी मुलगी तिच्या मांडीवर होती. यासोबतच शिल्पा शेट्टीने आपली बहीण शमिता शेट्टीला मतदान करण्याचे यावेळी आवाहन केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज कुंद्रा यावेळी तिच्यासोबत नव्हता. ती मुलांसोबत एकटीच होती.

वाचा-शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण ; पोस्ट शेअर करत दिली माहिती

राज कारमध्ये बसला होता शांत

ETimes च्या रिपोर्टनुसार, राज कुंद्रा मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून लपण्यासाठी कारमध्ये बसला होता. त्याने आपला चेहरा हुडी आणि मास्कने झाकला होता. राज कुंद्राने फोटोग्राफर्सना टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. या प्रकरणात अडकण्यापूर्वी राज कुंद्रा पापाराझींसमोर नेहमी पोज देतान दिसायचा. पण आता या सर्व प्रकारानंतर तो मीडियाच्या कॅमेऱ्यांना टाळताना दिसतो. इतकंच नाही तर ती सोशल मीडियावरही सक्रिय नाही. तर शिल्पा शेट्टी मात्र सोशल मीडियावर तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.

जुलै महिन्यात झाली होती अटक

या वर्षी जुलैमध्ये राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर विविध कायद्यांतर्गत गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्याने मीडियासमोर येणे टाळले.

वाचा-अंकिता-विकीच्या मेंदीत अशी झाली होती धम्माल! तुम्ही पाहिलात का हे PHOTO?

राज कुंद्रा का स्टेटमेंट

यापूर्वी राज कुंद्राने एक निवेदन जारी करून आपली बाजू स्पष्ट केली होती. त्याने म्हटले होती की, मीडिया आणि कुटुंबासमोर दुर्दैवाने मी आधीच दोषी सिद्ध झालो आहे. याबद्दल मला खूप वाईट वाटते. मी ट्रोलिंग, नकारात्मकता आणि लोकांच्या चुकीच्या मानसिकतेचा बळी ठरलो. पण काहीही झाले तरी लाजेने तोंड लपवणाऱ्यातला मी नाही. मी अशा करतो की मीडिया यापुढे माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणार नाही. माझे प्राधान्य नेहमीच माझे कुटुंब राहिले आहे आणि त्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. मला असे वाटते की प्रत्येक मनुष्याला त्याच्या सन्मानानुसार जीवना जगण्याचा अधिकार आहे. आणि मी देखील याची आशा करतो, असे निवेदन त्याने यापूर्वी जाहीर केले होते.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Raj kundra, Shilpa shetty