मुंबई, 27 डिसेंबर- मराठी बिग बॉसचा तीसरा सीजन रविवारी, 26 डिसेंबरला उत्साहात पार पडला. मराठी बिग बॉस सीजन तीनचा महाविजेता सांगलीचा विशाल निकम (bigg boss marathi 3 winner vishal nikam ) ठरला आहे. विशाल निकमने 20 लाख रूपये आणि बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर विशाल निकमने पहिली सोशल मीडिया पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे तो चर्चेत आला आहे. हा खास व्हिडिओ माझ्या Vishhalians साठी माझ्या वर विशालप्रेम करण्यासाठी! चांगभलं… #विशालप्रेम असं म्हणत विशाल निकमने इन्स्टा पोस्ट करत म्हटले आहे की, राम कृष्ण माऊली…आता मी हा व्हिडिओ कशासाठी करत आहेत माहिती आहे का…आज मी हे जे मिळवू शकले आहे ते विशालयनमुळे. माझ्यावर विशाल प्रेम करणाऱ्यांमुळे. ही ट्रॉफी प्रेक्षक मायाबापाची आहे..धन्यवाद..! त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर काहींनी त्याला सौंदर्याचे खरे नाव देखील विचारले आहे. आता सौंदर्या कोण आहे याबद्दल विशाल कधी खुलासा करणार हा देखील प्रश्न पडला आहे. सौंदर्या च खर नाव काय आहे हे आमाला आयकायच आहे..असं चाहते मंडळी विचारत आहेत. वाचा- बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकल्यानंतर विशाल निकमची पहिली प्रतिक्रिया विशालने बिग बॉसच्या घरात त्याची आई भेटायला आल्यानंतर सौंदर्याच्या नावाचा खुलासा केला होता. तेव्हापासून ही सौंदर्या कोण आहे तिचं खरं नाव काय असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे विशाल आता या त्याच्या मैत्रिणीबद्दल चाहत्यांना कधी माहिती करून देणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
विशाल निकमचा मराठी मालिका ते बिग बॉसच्या घऱापर्यंतचा प्रवास विशाल निकमचा जन्म सांगलीतल्या खानापूर येथे एका शेतकरी कुटुंबात 10 फेब्रुवारी 1994 साली झाला. सांगलीतील विटा येथून त्याने भौतिकशास्त्र या विषयातून पदवी घेतली आहे. त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल सांगायचे तर त्याने मिथुन चित्रपटातून 2018 मधे चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल टाकले. त्यानंतर त्याने स्टार प्रवाहवरील साता जन्माच्या गाठी या मालिकेत युवराज ही मध्यवर्ती भूमिका साकारली. ही त्याची पहिली मालिका होती. धुमस या मराठी चित्रपटातही तो झळकला आहे. तसेच विशाल निकमने स्टार प्रवाहवरील जय भवानी जय शिवाजी या ऐतीहासिक मालिकेत शिवा काशिद यांची भूमिका साकारली होती. यानंतर त्याने स्टार प्रवाहवरील दख्खनचा राजा जोतिबा या पौराणिक मालिकेतील जोतिबाची भूमिका साकारली. यानंतर तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या घरात पोहचला. या मालिकेने त्याला एक वेगळी ओळख दिली. या सगळ्या प्रवासात त्याला बिग बॉस मराठी तीसऱ्या पर्वात जाण्याची संधी मिळाली.