मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'बिग बॉस मराठी'च्या घरात एकमेकांचं तोंड पाहाण्यास नव्हते तयार, आता दोघं काय करतात पाहा..

'बिग बॉस मराठी'च्या घरात एकमेकांचं तोंड पाहाण्यास नव्हते तयार, आता दोघं काय करतात पाहा..

बिग बॉस मराठीच्या  घरात विशाल निकम आणि मीरा जगन्नाथचं एक क्षण देखील पटलं नाही. मात्र घरातून बाहेर आल्यानंतर या दोघांच्या एक व्हिडिओ समोर आला आहे.

  • Published by:  News18 Trending Desk
मुंबई, 5 एप्रिल- बिग बॉस मराठीचा (bigg boss marathi ) यंदाचा तिसरा सीझन प्रचंड गाजला. आजही प्रेक्षक या शोतील स्पर्धकांना मिस करताना दिसले. या शोमध्ये जीतकी मैत्रीची चर्चा झाली तितकीच भांडणाची देखील चर्चा झाली. पण काही असे सदस्य या घरात होते जे एकमेकांसोबत नेहमी भांडण करताना दिसले. घरात एकमेकांच्या समोर येणं देखील त्यांना आवडत नव्हतं. त्यापैकी एक नाव बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम आणि मीरा जगन्नाथचं  ( vishal nikam and mira  jagannath) आहे. दोघाचं घरात एक क्षण देखील पटलं नाही. मात्र घरातून बाहेर आल्यानंतर या दोघांच्या एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून विश्वास बसणार नाही. वाचा-पुष्पाच्या 'श्रीवल्ली'चा झाला आहे साखरपुडा, 25व्या वयात नॅशनल क्रश बनली रश्मिका विशाल निकम सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याचे विविध व्हिडिओ तसेच फोटो देखील तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकताच त्याने मीरासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.यामध्ये विशाल आणि मीरा भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. घऱातून बाहेर आल्यानंतर या दोघांच्यात मैत्री झाल्याचं दिसत आहे. मीरा आणि विशालच्या या डान्स व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. शिवाय त्यांच्या मैत्रीचे देखील कौतुक होत आहे. वाचा-परीचा आईच्या साडीवर 'ढोलिडा' वर डान्स, एक्स्प्रेशन्स पाहून आलियाला विसराल! विशालनं हा व्हिडिओ शेअर करच म्हटलं आहे की, बिग बॉसमध्ये आम्हा दोघांचं बाकी काही पटो या ना पटो पण मॉर्निग डान्स म्हटलं की,कमालीचं जमायचं 😂🕺💃कोण कोण आमचा मॉर्निग डान्स मिस करत आहे?
विशाल निकम सध्या आई मायेचं कवच या मालिकेत दिसत आहे. तर मीरानं घरातून बाहेर आल्यानंतर जय दुधाणे याच्यासोबत एक गाणं केलं आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर अनेक स्पर्धकांना काहींना काम मिळालं आहे. कोणाला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आहे, तर कोण विविध फोटोशूटमुळे देखील चर्चेत असतं.
First published:

Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment

पुढील बातम्या