मुंबई, 4 एप्रिल- माझी तुझी रेशीमगाठ**( mazi tuzi reshimgath )** मालिकेत छोट्या परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळ (myra vaikul) सोशल मीडिया स्टार आहे. मालिकेतील छोट्या परीमुळं ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. सध्या देखील तिचे सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओ चाहत्यांचे लक्षवेधून घेत असतात. अनेकजण केवळ परीमुळं आम्ही माझी तुझी रेशीमगाठ**( myra vaikul latest video )** ही मालिका पाहत असल्याचे सांगताना दिसतात. इतकी परीची चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. सध्या परीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच रर्चेत आला आहे. यामध्ये परी चक्क आईची साडी घालून आलिया भट्टच्या ढोलिडा गाण्यावर डान्स करत आहे. मायराच्या इन्स्टा पेजवर तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मायराने तिच्या आईची साडी नेसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे ती या साडीत भन्नाट डान्स करताना दिसत आहे. आलिया भट्टच्या ढोलिडा गाण्यावर ती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. अनेक सेलेब्सनी या गाण्यावर डान्स केला आहे. मात्र मायराचा डान्स मात्र सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. चाहत्यांकडून या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. वाचा- महेश कोठारेंच्या सूनबाई दिसणार ‘या’ मालिकेत, साकारणार महत्त्वाची भूमिका मायरा डान्स तर उत्तम करतेच पण तिच्या या गाण्यातील एक्स्प्रेशन्स पाहण्यालायक अशाच आहेत. या वयात कोण इतका सुंदर डान्स तोही साडीत विथ एक्स्प्रेशन्स कसं काय करू शकतं असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. तिचा डान्स आणि एक्स्प्रेशन्स पुढे नेटकऱ्यांना आलिया देखील फिकी वाटत आहे. मायराचा हा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर देखील प्रचंड व्यायरल होत आहे. सोबतच तिने आलियासारखेच हुबेहूब एक्स्प्रेशन्स दिले आहेत. त्यामुळे मायरा पुढे आता आलिया फिकी पडल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परी म्हणजेच मायरा वायकुळ सर्वांचेच लक्ष वेधून घेते आहे. तिची निरागसता, बोलण्यातील साधेपणा आणि हसणे, मुरडणे, रुसणे पाहायला खूपच मजा येते. तिचा अभिनय देखील अप्रतिम आहे. खरेतर या मालिकेआधी देखील तिचे अनेक चाहते होते. मायरा वायकुळचे. इन्स्टाग्रामवरही खूप फॉलोअर्स आहेत. युट्युबवर Myra’s corner World Of Myra and Family आणि नावाने मायराचे चॅनेल देखील आहे.