जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'Bigg Boss Marathi' फेम उत्कर्ष शिंदे लवकरच दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

'Bigg Boss Marathi' फेम उत्कर्ष शिंदे लवकरच दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

'Bigg Boss Marathi' फेम उत्कर्ष शिंदे लवकरच दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) चा तिसरा सीजन प्रचंड गाजला. या शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 जानेवारी-   ‘बिग बॉस मराठी’   (Bigg Boss Marathi)  चा तिसरा सीजन प्रचंड गाजला. या शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. इतकंच नव्हे तर शोमधील स्पर्धकांना या शोने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. उत्कर्ष शिंदे  (Utkarsh Shinde) यालासुद्धा बिग बॉसमुळे एक नवी ओळख मिळाली आहे. आपलं चातुर्य,हुशारी आणि बोलक्या वृत्तीने उत्कर्ष बिग बॉसच्या टॉप फोर स्पर्धकांमध्ये पोहोचला होता. शो संपल्यानंतर चाहते आता स्पर्धकांना प्रचंड मिस करत आहेत. दरम्यान उत्कर्षच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उत्कर्ष लवकरच एका नव्या कार्यक्रमातून तुमच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बॉस मराठी’ या शो ने गेली तीन महिने चाहत्यांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. या शो ने चाहत्यांना अक्षरशः खिळवून ठेवलं होतं. बिग बॉसच्या घरात दररोज होणारे वाद, राडे, मैत्री आणि प्रेम या गोष्टींनी रसिक प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. बिग बॉसच्या तिसऱ्या सीजनमध्ये अनेक ओळखीचे चेहरे चेहरे पाहायला मिळाले. त्यांनी प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. या स्पर्धकांना महाराष्ट्राच्या जनतेने अफाट प्रेम दिल आहे. विशाल निकम या सीजनचा विजेता ठरला. परंतु इतर प्रेक्षकांनी चाहत्यांचं मन जिंकलं आहे. त्यातीलच एक स्पर्धक उत्कर्ष शिंदे होय. आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा कोणातही गाजावाजा न करता उत्कर्षने आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळेच बिग बॉस संपताच त्याला एका नव्या कार्यक्रमाची संधी चालून आली आहे.

जाहिरात

अनेक सोशल मीडियावर पेजवर उत्कर्ष शिंदे नव्या कार्यक्रमात झळकणार असल्याच्या पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत.या पोस्टना आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये मेन्शन करत, उत्कर्षने हे मान्य केलं आहे. की तो लवकरच आपल्या भेटीला येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार उत्कर्ष शिंदे कलर्स मराठीवरच पुन्हा दिसणार आहे. यावेळी तो एका होस्टच्या भूमिकेत असणार आहे. हा शो कोणता असेल याबद्दल अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. परंतु हा शो लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. (हे वाचा: Lagnachi Bedi: ‘दुहेरी’, छत्रीवालीनंतर तब्बल 2 वर्षांनी संकेत पाठकचं कमबॅक! ) याबद्दल बोलताना उत्कर्ष शिंदे म्हणाला, ‘ज्या वाहिनीवर बिग बॉस मराठी प्रसारित झाला. त्याच वाहिनीवर मला कार्यक्रम होस्ट करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मी फारच उत्सुक आहे. सध्या आम्ही प्री-प्रोडक्शन प्रक्रियेत आहोत. लवकरच भेटू’. बिग बॉस मराठीमध्ये उत्कर्षला अनेकदा आपण होस्ट करताना किंवा नवनव्या कविता करताना पाहिलं आहे. त्याच्यामध्ये नेहमीच सर्वांना एक होस्टची कॉलिटि दिसून आली आहे. त्याला पुन्हा एकदा पडद्यावर पाहता येणार यामुळे चाहते फारच उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात