मुंबई, 3 फेब्रुवारी- बिग बॉस मराठीचा तिसरा **( Bigg Boss Marathi 3 )**सीजन चांगलाच गाजला. शो संपला असला तरी आजही या शोतील स्पर्धकांना आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. यातील अनेक स्पर्धकांना घऱातून बाहेर आल्यानंतर नवीन प्रोजेक्टस मिळालेत. यापैकी जय दुधाणे आणि मीरा जगन्नाथला उत्कर्ष शिंदेसोबत नवीन गाणं करण्याची संधी मिळाली आहे. या गाण्याचे शुटिंग नुकतेच झाले आहे. आता या पाठोपाठ बिग बॉसच्या आणखी एका स्पर्धकाला उत्कर्ष शिंदेच्या गाण्यात काम करण्याची संधी मिळाली आहे. एका पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, जय दुधाणे आणि मीरा जगन्नाथला उत्कर्ष शिंदेसोबत नवीन गाणं करण्याची संधी मिळाली आहे. यानंतर आता गायत्री दाताराला देखील उत्कर्ष शिंदेसोबत गाणं करण्याची संधी मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. या गाण्याचे नाव काय आहे याबद्दल अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. शिवाय गायत्री दातार हिच्याकडून देखील याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वाचा- रणविजयचा Rodies ला टाटा-बायबाय, हा बॉलिवूड अभिनेता करणार होस्ट! बिग बॉस मराठीच्या घऱात दोन टीम होत्या. यामध्ये जय दुधाणे, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे तसेच गायित्री दातार यांचा एक गट होता. यापैकी मीरा जगन्नाथ आणि गायित्री दातार यांच्या मैत्रिची संपूर्ण घरात चर्चा होती. त्याचप्रमाणे जय, मीरा आणि उत्कर्षच्या मैत्रिची देखील चर्चा होती. आता या गाण्याच्या निमित्त का होईना या सर्वांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली आहे. या शोमुळे अनेकांना नवीन प्रोजेक्ट मिळाले आहे. सुरेखा कुडची यांनी नवीन मालिका मिळाली आहे. तर जय दुधाणेला घरात असतानाच सिनेमाची ऑफर मिळाली आहे.
गायत्री दातारविषयी थोडसं.. तुला पाहते रे’ या मालिकेमुळे गायत्री दातार घराघरात पोहोचली. या मालिकेत गायत्रीने मध्यमवर्गीय घरातील ईशाची भूमिका साकारली होती. ही ईशा प्रेक्षकांना खूपच आवडली होती. मुंबई जन्म झालेल्या गायत्रीचे सर्व शिक्षण पुण्यात झाले आहे. लहानपणापासूनच गायत्रीला अभिनयाची आणि नृत्याची आवड होती. त्यामुळे कॉलेजमध्ये गेल्यावरही तिने आपली ही आवड जोपासली.अभिनय आणि नृत्याबरोबरच गायत्रीला ट्रेकिंगचीही खूप आवड आहे. इतकेच नाही तर तिने ट्रेकिंगचे प्रशिक्षणही घेतले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात गायत्री खूप छान रमते. सोशल मीडियावरही गायत्री खूपच सक्रीय असते.