वगुुमुंबई, 13 डिसेंबर - बिग बॉस मराठीच्या ( bigg boss marathi 3 latest episode) घरामध्ये आज उत्कर्ष मीरा चर्चा करताना दिसणार आहेत. मीराला घरच्या सदस्यांनी नाराज केले आहे, त्याविरुध्द तिची तक्रार आहे. जी ती आज उत्कर्षला सांगताना आणि तिचा मुद्दा मांडताना दिसणार आहे. मीरा उत्कर्षला सांगणार आहे, “जेव्हा टास्क होतो उमेदवारी आली इथून जय तू ये इथून विशाल येणार… बाकीच्या मुलीसुद्धा आहेत. याच्यावर मला सोनाली आणि मीनलबरोबर पण बोलायचं होतं पण मी नाही बोलले आजपर्यंत… जेव्हा सोनाली सुध्दा बोलायची ती स्वत:चं नावं कधी बोलत नव्हती रे किंवा मीनलचं सुध्दा आजपर्यंत नावं तिने पुढे नाही केले. उमेदवारीसाठी किंवा कशासाठी सुध्दा. नेहेमी तिला विशाल, विकास, जय उत्कर्ष हेच दिसायचे. का तू पण मुलगी आहेस ना तू तुझं नावं दे, मीनलचे नाव दे किंवा दुसर्याचे नाव दे. माझा हा प्रॉब्लेम होता. आणि मी म्हणून म्हंटल की सगळयांशी होता माझा प्रॉब्लेम. मी इथे फक्त मुलं असं नाही लिहिलं. इथे सगळे जण मिळून खेळायला आले आहे आणि पुढे मुलांमध्ये हे जाणार मुलीममध्ये … या गोष्टी करत होते ते मला नव्हतं पटतं. मुली असूनसुध्दा तुम्ही स्वत:ला पुढे न घेता दुसर्या मुलांना घेता आहे पुढे. माझी ही तक्रार होती. आता यावर उत्कर्ष किंवा जय काय म्हणाले त्यांनी कोणते मुद्दे मांडले आज कळेलच. वाचा: Bigg Boss Marathi च्या घरातील मोठं एलिमिनेशन; गायत्री दातार आऊट बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झाली नव्या सदस्यांची एंट्री. घराचे रूपांतर लिलिपुट नगरात झाले आणि हे नवे सदस्य बनले हुकूमशहा. हा संपूर्ण आठवडा या हुकुमशहांनी चांगलच गाजवला मग तो एलिमनेशन टास्क असो, साप्ताहिक कार्य असो वा कॅप्टन्सी टास्क. मीनलला मिळाला बिग बॉस मराठीच्या घराचे शेवटचे कॅप्टनपद. तर नॉमिनेशन कार्यात गायत्री दातार, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ आणि सोनाली पाटील नॉमिनेट झाले. यामध्ये काल मीरा जगन्नाथ सेफ असल्याचे महेश मांजरेकरांनी घोषित केले. उत्कर्ष स्नेहामध्ये झाली शाब्दिक चकमक तर बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या फन्सची चुगली चुगली बूथद्वारे विशालला सांगण्यात आली आता यामुळे इतक्या दिवसांची मैत्री पणाला तर लागणार नाही ना ? उत्कर्ष आणि जयने यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण करत लावणी सादर केली. इतक्या दिवसांच्या प्रवासानंतर कोणा एका सदस्याला घराबाहेर पडणे अनिवार्य असल्याने सोनाली आणि गायत्री डेंजर झोनमध्ये आल्या ज्यामध्ये गायत्री दातारला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.
तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिजन तिसरा दररोज आपल्या कलर्स मराठीवर.