मुंबई, 26 मार्च- बिग बॉस फेम मराठीच्या तिसऱ्या (Bigg Boss Marathi 3 ) पर्वातील स्पर्धक आदिश वैद्य (adish vaidya) त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असतो. नेहमी त्याची गर्लफ्रेंड रेवती लेलेसोबतचे काही व्हिडिओ (adish vaidya and revati lele) ) शेअर करत असतो. आदिश सध्या त्याची गर्लडफ्रेंड रेवतीसोबत (revati lele) सुट्टयांचा आनंद घेत आहे. त्यानं एक रोमॅंटिक व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. आदिश वैद्यने त्याच्या इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या उन्हाळा आहे. या उन्हाळ्यात आदिश त्याची गर्लफ्रेंड रेवतीसोबत उदयपूरला पोहोचला आहे. रेवतीसोबत मस्त तो सुट्टयांचा आनंद घेताना दिसत आहे. तिच्यासोबतचा रोमॅंटिक व्हिडिओ शेअर करत त्याने याबद्दल माहिती दिली आहे. दोघेही एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहेत. चाहते देखील आवडत्या जोडीला एकत्र पाहून आनंद झालं आहे. कमेंट करत चाहते दोघांविषयी प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. वाचा- पहिल्याच दिवशी RRR ने बॅटमॅनला पछाडलं, केली रेकॉर्डब्रेक कमाई कुंकू टिकली आणि टॅटू’ आणि ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकांमध्ये आदिशने काम केलं आहे. त्यासोबत ‘जिंदगी नॉट आउट’, ‘बॅरिस्टर बाबू’, ‘गुम है किसीं के प्यार में’, ‘नागीण’ या हिंदी मालिकांमध्येही तो झळकला आहे. ‘गुम है किसी के प्यार में’ या लोकप्रिय मालिकेतील आदिशची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. परंतु, बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी आदिशने मालिकेचा निरोप घेतला होता. बिग बॉसच्या घरातून आदिश बाहेर पडल्यानंतर नवीन प्रोजेक्टमध्ये दिसला नाही मात्र सोशल मीडियावर धमाल रील शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो.
रेवती एक उत्कृष्ट नृत्यांगना असून आदिश आणि रेवती यांनी ‘नागीण’, ‘जिंदगी नॉट आउट’ या मालिकांमध्ये एकत्र काम केलं आहे. रेवतीने कलर्स मराठी वाहिनीवरील ‘स्वामींनी’ या मालिकेत मोठया रामाबाईंची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून रेवतीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. सध्या रेवती लग्नाची बेडी या मालिकेत दिसत आहे.