मुंबई, 26 मार्च- ‘बाहुबली’ (Bahubali) फेम एसएस राजामौली (S.S. Rajamouli) यांचा आरआरआर या चित्रपटाने प्रदर्शित होताच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. राम चरण (Ram charan) आणि ज्युनियर एनटीआरने (Jr. NTR) प्रेक्षकांना भुरळ घातलेली पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल इतके चांगले रिव्ह्यू मिळत आहेत की, चित्रपट समीक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या चित्रपटाने फक्त भारतच नव्हे तर परदेशी प्रेक्षकांनाही रोमांचित केलं आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अनेक रेकॉर्ड मोडीत काढताना दिसत आहे. साऊथ दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा पीरियड अॅक्शन चित्रपट RRR 25 मार्च रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषेतही प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने हिंदी व्हर्जनने 18 कोटींची कमाई केली आहे. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या मते, RRR ने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिकेत जबरदस्त ओपनिंग केली आहे.
#RRRMovie will be the 2nd Indian Film to Gross ₹200 Cr on it’s 1st Day after #Baahubali2. While it’s most likely to overtake BB2 in India. Overseas Numbers will settle the Record!
— AndhraBoxOffice.Com (@AndhraBoxOffice) March 25, 2022
इतकंच नव्हे तर असा दावा केला जात आहे की RRR बद्दल इतकी क्रेझ आहे की अमेरिकन सुपरहिरो चित्रपट ‘द बॅटमॅन’ लासुद्धा धोबीपछाड दिलं आहे. सोबतच हा चित्रपट परदेशी बॉक्स ऑफिसवर नंबर वन बनला आहे. ऑस्ट्रेलियात 4.03 कोटी, न्यूझीलंडमध्ये 37.07 लाख आणि अमेरिकेत 38 कोटींहून अधिक कमाई केली आहे. महत्वाचं म्हणजे या चित्रपटाने साऊथमध्ये १०० कोटींहुन अधिक कमाई केल्याचं म्हटलं जात आहे. जगभरातील कमाईचा आकडा पाहता या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 200 कोटींचा आकडा पार केला आहे.