त्यांनतर आता दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान घरामध्ये 'नाव मोठे लक्षण खोटे' असा नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. यामध्ये घरातील सदस्यांनी एकमेकांच्या घरातील अपुऱ्या योगदानावर, घरातील प्रत्येक गोष्टीतील उपस्थिती तसेच शोमध्ये केलं जाणारं मनोरंजन यावर खुलेपणाने भाष्य करत एकमेकांना नॉमिनेट केलं आहे.