Home /News /entertainment /

Bigg Boss Marathi 3 ची B टीम पहिल्यांदा दिसली एकत्र; निमित्त खास मात्र एक सदस्य मिसिंग

Bigg Boss Marathi 3 ची B टीम पहिल्यांदा दिसली एकत्र; निमित्त खास मात्र एक सदस्य मिसिंग

'Bigg Boss Marathi 3' ची B टीम पुन्हा एकत्र दिसली. निमित्त होते खास मात्र यातील एक सदस्य मिसिंग होता.

  मुंबई, 25 जानेवारी- यंदाचा बिग बॉस मराठीचा तिसरा (Bigg Boss Marathi 3) सीजन तुफान गाजला. या सीजनमध्ये चर्चा झाली ती मैत्रिची आणि टीम A आणि टीम B ची. या दोन्ही टीमने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. विशेष म्हणजे टीम Bचा स्पर्धक विशाल निकम याने बिग बॉस मराठीचा किताब जिंकला. आता पुन्हा एकदा B टीम एकत्र दिसली. मात्र यावेळी यातील एक सदस्य मिसिंग होता. A टीममध्ये मीरा जगन्नाथ, जय दुधाणे तसेच उत्कर्ष शिंदे, नेहा वाघ यांचा समावेश होताय तर B टीममध्ये विशाल निकम, विकास पाटील, सोनाली पाटील, मिनल शाह, आदिश वैद्य यांचा समावेश होता. यांच्यातील मैत्रि शेवटपर्यंत टिकली. घराबाहेर देखील यांच्यातील मैत्रि तशीच आहे. घरातून बाहेर पडताच यातील अनेकांनी एकमेकांच्या भेटी घेतल्या. आता पुन्हा एकदा सर्वांची आवडती बी टीम एकत्र आली आहे. निमित्त देखील खास होते. वाचा-'माझा होशील ना' फेम सईच्या घरी चिमुकलीचे आगमन, क्यूट VIDEO पाहाच! झोंबिवली (Zombivli Premiere ) चित्रपटाच्या निमित्ताने बिग बॉस मराठीची B टीम पुन्हा एकत्र आलेली दिसली. यावेळी मिनल शाह, विकास पाटील, आदिश वैद्य व विशाल निकम एकत्र दिसले. मात्र या सगळ्यात या टीममधला एक सदस्य मिसिंग होता. एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आले देखील असेल. तो सदस्य म्हणजे दुसरी तिसरी कोण नसून बडबडी गर्ल सोनाली पाटील होय. वाचा-Richard Gere सोबत चुंबन प्रकरणात Shilpa Shetty ला 15 वर्षांनंतर कोर्टाचा दिलासा! चित्रपटाच्या प्रिमियरला अनेक मराठी विश्वातील कलाकारांनी हजेरी लावली. यामध्ये प्राजक्ता माळी, प्रसाद ओक, पूजा सावंत, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे हिनं देखील हजेरी लावली. यासोबत बिग बॉस मराठी तीनची बी टीम देखील दिसली. सर्वजण धमाल करताना दिसले.
  झोंबिवली ( Zombivli ) आदित्य सरपोतदार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या 26 जानेवारी रोजी हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पहिल्यांदाच अमेय वाघ (Amey Wagh) व ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) यांचा हटके अंदाज या सिनेमात पाहण्यास मिळणार आहे.झोंबीवर आधारित असलेला हा पहिला चित्रपट आहे. यात झोंबी बनलेले बरेच जण अमेय आणि ललितच्या मागावर आहेत.महेश अय्यर, साईनाथ गणूवाद, सिद्धेश पूरकर, योगेश जोशी यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या