मुंबई, 25 जानेवारी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राला एका मोठ्या प्रकरणात न्यायालयाने दिलासा दिला आहे. 2007 मध्ये राजस्थानमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राला (Shilpa Shetty Kundra) हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेने (Richard Gere) किस केले होते, त्यानंतर अभिनेत्रीवर सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता (obscenity) पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता. आता 15 वर्षांनंतर न्यायालयाने शिल्पाला या प्रकरणात माफ केले आहे. तिची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे. काय होतं नेमकं हे प्रकरण? चला जाणून घेऊया.
मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट केतकी चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर शिल्पा शेट्टीने आपली भूमिका स्पष्ट केली होती. पोलिसांचा अहवाल आणि सादर केलेल्या कागदपत्रांचा विचार केल्यानंतर दंडाधिकार्यांनी शिल्पावरील आरोप निराधार असल्याचे सांगत तिची आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

2007 मध्ये घडलेल्या या घटनेनंतर अभिनेत्याविरुद्ध राजस्थानमध्ये दोन आणि गाझियाबादमध्ये अश्लीलतेच्या आरोपाखाली एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2017 मध्ये हे प्रकरण मुंबईला हस्तांतरित करण्याच्या त्यांच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. दुसरीकडे, शिल्पा शेट्टी हिने अधिवक्ता मधुकर दळवी यांच्यामार्फत सीपीसीच्या कलम 239 (पोलिस अहवाल आणि कागदपत्रे विचारात घेतल्यानंतर डिस्चार्ज) आणि 245 (पुराव्यांच्या विचारानंतर डिस्चार्ज) अंतर्गत डिस्चार्जसाठी अर्ज केला.
काय होतं प्रकरण?
2007 मध्ये शिल्पा शेट्टीने एड्सबद्दल जनजागृती करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात भाग घेतला होता. या कार्यक्रमात अभिनेता रिचर्ड गेरेने शिल्पा शेट्टीला पकडून जाहीर चुंबन (Richard Gere Kissing Shilpa Shetty) घेतले. त्यावेळी या प्रकरणावरून बराच वाद झाला होता. भारतीय न्यायालयाने शिल्पा शेट्टीविरोधात अटक वॉरंट जारी केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.