भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान दोन्ही टीम आणि संपूर्ण स्टेडिअमपेक्षा जास्त एनर्जी कोणामध्ये होती तर तो होता रणवीर सिंग. सामन्यादरम्यान, त्याची कॉमेंट्री आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंवरून रणवीर सिंग या सामन्यादरम्यान किती उत्साहात होता ते कळतं.
एखाद्या कट्टर चाहत्याप्रमाणे त्याने अनेक क्रिकेटपटूंसोबत सेल्फी आणि व्हिडिओज काढले. एकीककडे विराट कोहलीसोबत गंभीर गप्पा मारताना तो दिसला तर दुसरीकडे गांगुलीसोबतचा फोटो पाहून प्रत्येकजण आपलं हसू रोखू शकला नाही.
रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नावाजलेल्या क्रिकेटपटूंसोबतचे फोटो शेअर केले. यातला सर्वात मजेशीर फोटो होता तो म्हणजे दादा सौरव गांगुलीसोबतचा. सौरव कॅमेऱ्याकडे पाहून हसताना दिसतोय तर रणवीर मात्र त्याला किस करताना दिसत आहे. नेमकी याच गोष्टीचं सौरवला हसू आलं असेल.
सचिन तेंडुलकरसोबत सेल्फी काढणं ही प्रत्येक क्रिकेटप्रेमीची इच्छा असेल. लाखो चाहत्यांपैकी रणवीर एक असल्यामुळे त्याने सचिनसोबत सेल्फी काढण्याची संधी सोडली नाही.
मुल्तानचा सुलतान वीरेंद्र सेहवागसोबतही त्याने यावेळी सेल्फी काढला. यावेळी दोघांनी भरपूर मस्तीही केली
माजी क्रिकेटपटू ब्रायन लारालाही रणवीर आवर्जुन भेटला आणि त्याच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
भारत- पाकिस्तान सामन्यावेळी हरभजन सिंगलाही रणवीर भेटला. रणवीर सिंग सध्या इंग्लंडमध्ये त्याच्या आगामी ८३ सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. या सिनेमात तो कपिल देव यांची व्यक्तीरेखा साकारत आहे.
या सिनेमात दीपिका पदुकोणही दिसणार आहे. कपिल देवच्या पत्नीची भूमिका दीपिका साकारताना दिसणार आहे. लग्नानंतर दोघं पहिल्यांदा एका सिनेमात काम करणार आहेत. याआधी दोघांनी संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात एकत्र काम केलं होतं.
रणवीरचा आगामी सिनेमा १९८३ वर्ल्ड कपच्या पाश्वभूमीवर तयार करण्यात येत आहे. कबीर खान या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून पुढच्या वर्षी १० एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.