मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'हो मी वेगळा आहे'; Bigg boss फेम अभिनव शुक्लाने उलगडलं आपलं मोठं गुपित

'हो मी वेगळा आहे'; Bigg boss फेम अभिनव शुक्लाने उलगडलं आपलं मोठं गुपित

आपण वेगळे आहोत हे स्वीकारण्यासाठी आपल्याला दोन दशकं लागली, असा खुलासा अभिनव शुक्लाने (Abhinav shukla) केला आहे.

आपण वेगळे आहोत हे स्वीकारण्यासाठी आपल्याला दोन दशकं लागली, असा खुलासा अभिनव शुक्लाने (Abhinav shukla) केला आहे.

आपण वेगळे आहोत हे स्वीकारण्यासाठी आपल्याला दोन दशकं लागली, असा खुलासा अभिनव शुक्लाने (Abhinav shukla) केला आहे.

मुंबई, 09 ऑगस्ट : ‘खतरों के खिलाडी’ या शोचा सध्या 11 वा सीझन (KKK Season 11) सुरू आहे. या शोमध्ये अभिनेता अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) हादेखील सहभागी आहे. रविवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये अभिनव एलिमिनेशनपासून (Abhinav Shukla in KKK) थोडक्यात वाचला. मात्र या एपिसोडमधील टास्कदरम्यान त्याला असलेला एक आजार (Abhinav Shukla disease) सर्वांना समजला. गेली कित्येक वर्षे त्याने हा आजार इतरांपासून लपवून ठेवला होता. यानंतर अभिनवने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत खुलासा केला.

अभिनव शुक्लाने अनेक टीव्ही सीरियल्समध्ये अभिनय केला आहे. बिग बॉसच्या 14 व्या सीझनमुळे मात्र तो सर्वात जास्त प्रसिद्ध (Abhinav Shukla in Bigg Boss 14) झाला. बिग बॉसमध्ये तो आपली पत्नी रुबीना दिलैकसोबत (Abhinav Shukla Wife) आला होता. त्यानंतर आता तो खतरों के खिलाडीमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमधील टास्कदरम्यान त्याला डिस्लेक्सिया (Abhinav Shukla Dyslexia) हा आजार असल्याचे सर्वाना समजले, ज्यानंतर त्याने ट्विट करत याबाबत खुलासा केला.

हे वाचा - शमिता शेट्टी का गेली Bigg Boss मध्ये? मेकर्सने सांगितलं अजब कारण

आपल्या ट्विटमध्ये अभिनव (Abhinav Shukla tweet) म्हणतो, "मी बॉर्डरलाईन डिस्लेक्सिक आहे. आता हे सर्वांनाच माहिती झालं आहे. त्यामुळेच मी आता याबाबत अधिक खुलासा करणार आहे. यामध्ये कोणाचाही दोष नाही, माझाही नाही. जे आहे ते आहे. मला हे स्वीकारण्यासाठी 2 दशकं लागली. लागली. मात्र, आता मला आकडे आणि संख्या पाहून भीती किंवा लाज वाटत नाही"

आपल्या ट्विटचा स्क्रीनशॉट त्याने इन्स्टाग्रामवरही (Abhinav Shukla insta) शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय की,  "अंक, संख्या, शब्द हे सगळे मला संभ्रमात टाकतात. नावं, तारखा आणि त्यांचा परस्पर संबंध लक्षात ठेवण्यास मला अडचण येते. मात्र इतर काही बाबतीत माझ्याकडे चांगली स्किल्स आहेत. जसं मला काही गोष्टी येत नाहीत, तसंच काही गोष्टी खूप चांगल्या जमतात. ज्या गोष्टींमध्ये मी कमी पडतो, तिथे सुधारण्याचा प्रयत्न मी करत असतो"

हे वाचा - दीपिकाचं आपल्या बॉडीगार्डसोबत आहे खास नातं; त्याचा पगार ऐकून व्हाल हैराण

दरम्यान, अभिनवला डिस्लेक्सिया (Abhinav Shukla Dyslexia) असल्याचं समजल्यानंतर त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अभिनवला असा एखादा आजार असल्याचे त्याने आधी कधीच सांगितले नव्हते. बिग बॉसच्या (Abhinav Shukla in Bigg Boss) घरात असताना तर त्याने आपल्या आणि पत्नीमधील वादाबद्दलही सांगितलं होतं. तो आणि रुबीना वेगळं व्हायचा विचार करत होते, असा खुलासाही त्याने बिग बॉसमध्ये केला होता. मात्र तेव्हाही त्याने आपल्या आजाराबद्दल जराही कल्पना दिली नव्हती.

First published:

Tags: Big boss, Entertainment