मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शमिता शेट्टी का गेली Bigg Boss मध्ये? मेकर्सने सांगितलं अजब कारण

शमिता शेट्टी का गेली Bigg Boss मध्ये? मेकर्सने सांगितलं अजब कारण

राज कुंद्राची चौकशी सुरू असताना का गेली बिग बॉसमध्ये? शमिता शेट्टीनं दिलं अजब स्पष्टीकरण

राज कुंद्राची चौकशी सुरू असताना का गेली बिग बॉसमध्ये? शमिता शेट्टीनं दिलं अजब स्पष्टीकरण

राज कुंद्राची चौकशी सुरू असताना का गेली बिग बॉसमध्ये? शमिता शेट्टीनं दिलं अजब स्पष्टीकरण

मुंबई 9 ऑगस्ट: अश्लील व्हिडिओ बनवल्याच्या आरोपाखाली सध्या राज कुंद्रा (Raj Kundra Controversy) तुरुंगात आहे. याचा परिणाम राज कुंद्राशी संबंधित सर्व लोकांवर झाला आहे. कुंद्राची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही (Shilpa Shetty) याप्रकरणी चौकशीला जावं लागलं होतं. अशातच शिल्पाची बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) ही बिग बॉसमध्ये दिसून आली. राज कुंद्रा तुरुंगात असताना शमिता बिग बॉसमध्ये (Shamita Shetty in Bigg Boss) आल्याचं पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं होतं. पण शमितानेच पुढे येत आपण हा शो का करत आहोत याचं कारण स्पष्ट दिलं आहे.

बिग बॉस या रिएलिटी शोचा 15 वा सीझन आला आहे. रविवारपासून बिग बॉस 15 ओटीटी (Bigg Boss 15 OTT) ला सुरुवात झाली. हा शो करण जोहर होस्ट करत आहे. हा शो टीव्हीवर नाही, तर व्हूट ॲपवर (Voot App Bigg Boss) रिलीज झाला आहे. पहिल्या एपिसोडमध्ये जेव्हा या सीझनमधील स्पर्धकांची नावं जाहीर करण्यात आली, तेव्हा त्यात शमिता शेट्टीचंही नाव होतं. राज कुंद्रा प्रकरण सुरू असल्यामुळे शमिता बिगबॉसमध्ये (Shamita Shetty in Bigg Boss) येईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. त्यामुळे तिचं नाव पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. होस्ट करण जोहरने (Karan Johar) याबाबत विचारलं असता, शमिताने याबाबत स्पष्टीकरण दिलं. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

‘तुझा राज कुंद्राशी संबंध काय?’ शर्लिन चोप्राचा राखी सावंतला सवाल

शमिता म्हणाली, ‘राज कुंद्रा यांना अटक झाल्यानंतर मी शोमध्ये जाऊ की नको जाऊ याबाबत विचार करत होते. पण चांगल्या किंवा वाईट परिस्थितीत जर आपण श्वास घेणं सोडत नसू, तर आपलं काम का सोडायचं? असा विचार करून मी या शोमध्ये येण्याचा निर्णय घेतला.’ बिग बॉसची ऑफर (Bigg Boss Shamita Shetty) तिला या सर्व प्रकरणाच्या खूप आधी मिळाली होती. तेव्हाच तिने शोसाठी होकार कळवला होता. “या शोसाठी तेव्हाच कमिटमेंट दिल्यामुळे मी आता परत विचार नाही केला. कारण, एक बार जो मैं कमिटमेंट करती हूं, तो मैं खुद की भी नहीं सुनती” असं सलमान खानच्या चित्रपटातील संवाद वापरुन तिने स्पष्ट केलं.

शिल्पा शेट्टीवर आणखी एक आरोप; ‘स्पा’च्या नावाखाली केली कोट्यवधींची फसवणूक

दरम्यान, पहिल्या एपिडसोडमध्ये करणने शमिताला आपले कनेक्शन (Shamita Shetty Connection in Bigg Boss) म्हणून एकाची निवड करण्यास सांगितली. शमिताने राकेश बापट (Rakesh Bapat Bigg Boss) आणि करण नाथ यांची नावं निवडली. यानंतर राकेश आणि करणमध्ये एक टास्क झाला, ज्यात राकेश जिंकला. त्यामुळे आता राकेश आणि शमिता यांची जोडी ठरवण्यात आली आहे.

First published:

Tags: Bigg Boss OTT, Raj kundra