मुंबई, 27 नोव्हेंबर- उर्फी जावेद (Urfi Javed) बिग बॉस ओटीटीपासून (Bigg Boss OTT) सतत चर्चेत आहे. बिग बॉसमधील तिचा प्रवास फक्त 1 आठवड्याचा होता. या शोनंतर ती इतर स्पर्धकांच्या तुलनेत खूप चर्चेत आहे. उर्फी जावेद अनेकदा तिच्या विचित्र फॅशन आणि स्टाइलने लोकांना आश्चर्यचकित करते. उर्फीच्या फॅशनप्रमाणेच तिची लव्ह लाईफही सध्या चर्चेत आहे. उर्फी जावेद एकेकाळी 'अनुपमा' (Anupamaa) मध्ये समरची भूमिका साकारणारा अभिनेता पारस कलनावतला(Paras Kalnawat) डेट करत होती. पण, दोघांचे हे नाते फार काळ टिकले नाही.
आता पारस आणि उर्फी एकत्र नाहीत ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे. पण, दोघांच्या ब्रेकअपचे कारण काय होते, यावरून आता पडदा पडला आहे. उर्फी जावेदने आता एका मुलाखतीत सांगितले आहे की, तिचे आणि पारसचे ब्रेकअप का झाले आहे. दोघे वेगळे का झाले?
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत पारस कालनावतसोबतच्या ब्रेकअपचे कारण सांगताना उर्फीने सांगितले की, पारससोबतच्या डेटिंगला ती रिलेशनशिप मानत नाही. यासोबतच त्यांनी या नात्याचे वर्णन 'लहानपणी झालेली चूक' असे केले आहे.
उर्फी जावेद म्हणाली की,-'मी याला नाते मानत नाही. लहानपणी झालेली चूक होती. एकत्र आल्यानंतर महिनाभरानंतरच मला त्याच्यासोबत ब्रेकअप करायचं होतं. तो फक्त एका लहान मूलाप्रमाणे होता. त्याने माझ्या नावाचे तीन टॅटू काढले. माझ्या नावाचा टॅटू करून तो मला प्रभावित करण्याचा प्रयत्न करायचा. पण, तुमचं नात तुटल्यावर देखील असं कोण करतं, असा सवाल देखील तिनं या नात्यावरून उपस्थित केला.
वाचा : VIDEO : 'बायकासनी मारून टाकून ह्यो काय देवमाणूस हाय का?' महिलावर्गाचा पुतळा पाहून संतप्त सवाल
उर्फी पुढे म्हणाली की, 'मला त्याच्याकडे परत जायचे नाही कारण त्याने माझे नाव गोंदवले आहे. जरी त्याने माझे नाव संपूर्ण शरीरावर गोंदवून घेतले असते तरी मी त्याच्याकडे परत गेले नसते.'' यासोबतच उर्फीने असेही सांगितले की, ब्रेकअपनंतरही पारसने तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, तिने त्याचा फोन उचलला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg Boss OTT, Bollywood News, Entertainment