मुंबई, 27 नोव्हेंबर- : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस’(Devmanus). या मालिकेने 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता मालिकेचा दुसरा सिजन (Devmanus season 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देवमाणूस २ या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाल्याचे श्वेता शिंदेने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. त्यामुळे ती परत आलीये ह्या मालिकेच्या जागी आता देवमाणूस ही नवी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. डॉक्टरची भूमिका अभिनेता किरण गायकवाड याने साकारली होती. देवमाणूसच्या दुसऱ्या सीजनची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असून मालिकेचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मालिकेचा नवीन प्रोमो पाहून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. किरण गायकवाडनं एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत कातळवाडीतील ग्रामस्थांनी देवमाणसाचा म्हणजेच डॉ. अजित कुमार देवचा पुतळा उभारला आहे. हा पुतळा पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. वाचा :‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली रजनीकांत यांची शेजारी; खरेदी केलं कोट्यावधींचं घर मालिकेच्या सिक्वलमध्ये डॉक्टरच्या भूमिकेसाठी त्याचीच वर्णी लागणार आहे हे निश्चित झालं आहे. लवकरच मालिकेतील अन्य कलाकारांचा देखील उलगडा होईल पण एकीकडे मालिकेची उत्सुकता असतानाच डॉ अजितकुमार देव यांचा पुतळा जोरदार चर्चेत आला आहे. मालिकेतील डॉक्टर अजितकुमार देवचा पुतळा सोशल मीडियावर पाहिला जातोय.
झी मराठीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई या ठिकाणी देवमाणूस मधील प्रमुख व्यक्तिरेखा डॉ अजितकुमार देवचे अर्धाकृती पुतळे पाहायला मिळले. आपल्या ओळखीच्या परिसरात अचानक हे पुतळे पाहून प्रेक्षकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. एकानं संताप व्यक्त करत म्हटलं आहे की , या नालायक माणसाचा पुतळा लावण्यापेक्षा या पुतळ्याला पहिला फाशी द्यायल पाहिजे असं म्हटलं आहे. तर एका महिलाचा ग्रुप देखील हा पुतळा पाहून चांगलाच भडकतो. त्यातील एक महिला म्हणतेय की, ह्यो माणूस देव माणूस म्हणतोय ह्यो काय देवमाणूस हाय काय…सगळ्या बायकासनी मारून टाकून, खून करून ह्यो काय देवमाणूस आहे का?…अशी ही महिला रागाने म्हणताना दिसत आहे. यावरून एक लक्षात येते की ही भूमिका लोकांच्या किती डोक्यात गेली आहे. सर्वजण याचा तिरस्कार करत आहेत. असं असले तर मालिका पाहण्यासाठीही तितकेच अतुर आहेत. वाचा :Bigg Boss Marathi: ‘सोनाली बाहेर काढेन…‘सोनालीवर भडकले महेश मांजरेकर काय आहे कारण, पाहा VIDEO काय होता मालिकेचा शेवट? 15 ऑगस्टला मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. त्यामुळे चाहते फारच उत्सुक होते. पण शेवटी प्रेक्षकांची निराशाच झालेली पाहायला मिळाली. आता तरी देवी सिंग पोलिसांच्या ताब्यात जाईल असं प्रेक्षकांना वाटत होतं पण तसं झालं नाही.दरम्यान शेवटी चंदाचा आणि विजयचा मृत्यू दाखवला आहे. याशिवाय नव्यानेच मालिकेत एन्ट्री दाखवलेल्या स्त्रीचा देखील डॉक्टर ने खून केलेला दाखवला आहे. वाड्यातील लोकांना देवमाणसाचा खरा चेहरा मात्र समजला नाही.चंदा आणि डॉक्टरचा मृत्यू झाल्याचं लोकांना समजत. तर डॉक्टरच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकूणच संपूर्णपणे अनपेक्षित शेवट पाहायला मिळाला आहे.
दरम्यान डॉक्टरचा मृत्यू झाला नसून तो जिवंत आहे. डिम्पलने चंदाचा खून केला. तर तिची बॉडी देखील जाळून टाकली. याशिवाय आणखी एक बॉडी तिथे जळत असते. तिच्या आजूबाजूला डॉक्टर च साहित्य पसरवलेल असतं. त्यामुळे डॉक्टरचाच मृत्यू झाल्याचं डिम्पलने भासावल होतं. तर आता ती देखील घरातून पळून गेली आहे.डॉक्टर एका दवाखान्यात अॅडमिट आहे. व तो अजूनही जिवंत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये ‘देवमाणूस 2’ची (Devmanus season 2) उत्सुकता वाढली आहे. तर मालिकेचा अद्याप शेवट झाला नसल्याने आणखी एक भाग येणार अशी चर्चा रंगताना दिसत आहे. अनेकांनी शेवट योग्य केला नाही यामुळे नाराजी व्यक्त केली होती.