जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / घरात दोन पोरी लग्नाच्या आणि सुंबूलचे बाबा पडले प्रेमात, दुसऱ्यांदा चडणार बहोल्यावर

घरात दोन पोरी लग्नाच्या आणि सुंबूलचे बाबा पडले प्रेमात, दुसऱ्यांदा चडणार बहोल्यावर

सुंबूलच्या घरी लगीनघाई..!

सुंबूलच्या घरी लगीनघाई..!

लवकरच सुंबूलचे वडील तौकीर खान लग्नगाठ बांधणार असल्याचे समोर आलं आहे. ज्यामुळे सुंबूलच्या घरात आणखी दोन सदस्यांची भर पडणार आहे

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 जून- बिग बॉसमुळे घराघारत पोहचलेली लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सुंबूल तौकीर खानच्या घरात लवकरत सनई- चौघडे वाजणार आहेत. सर्वांची लाडकी ‘इमली’ बनून सुंबूलनं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सुंबूल तिच्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. बिग बॉसच्या घरात तिचं नाव शालीन भनोटसोबत जोडलं गेलं होतं. नेहमीच ती शालीनच्या मागे-पुढे करताना दिसायची. याशिवाय यापूर्वी सुंबूलचं नाव तिचा कोस्टार फहमान खान याच्यासोबत जोडलं गेलं होतं,या दोघांची मैत्री चांगलीच चर्चेत आली होती. आता मात्र या दोघांची मैत्री तुटल्याचे समोर आलं आहे. एककीडे अभिनेत्रीच्या आय़ुष्यात काही ठीक नसताना तिची वडील आता दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. होय, तुम्ही वाचताय ते खरं आहे, लवकरच सुंबूलचे वडील तौकीर खान लग्नगाठ बांधणार असल्याचे समोर आलं आहे. ज्यामुळे सुंबूलच्या घरात आणखी दोन सदस्यांची भर पडणार आहे. खरं तर, सुंबूलचे वडील ज्या महिलेसोबत लग्न करणार आहेत, त्या महिलेचा घटस्फोट झाला आहे आणि तिला आधीच एक मुलगी आहे. अशा तऱ्हेने सुंबूलच्या घरात आणखी दोन नव्या सदस्यांची भर पडणार आहे. स्वत: सुंबुलने वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला दुजोरा दिला आहे. वाचा- बॉलिवूडचे सर्वात कंजूस स्टार्स; करोडोची कमाई पण खर्च करताना घासाघीस सुंबूलने सांगितले की, तिचे वडील तौकीर हसन एका घटस्फोटित महिलेशी लग्न करत आहेत, ज्यांचे नाव निलोफर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निलोफरला पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगी देखील आहे, जी लग्नानंतर त्याच्यासोबत राहणार आहे. म्हणजे लग्नानंतर तिच्या घरात एक नव्हे तर दोन नवे सदस्य जोडले जाणार आहेत. सुंबूलच्या वडिलांचे पुढील आठवड्यात लग्न होणार असल्याचे बोलले जात आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सुंबूल म्हणाली की, मी माझ्या नवीन आई आणि बहिणीचे घरी स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहे. विशेष म्हणजे सुंबूलन वडिलांच्या दुसऱ्या लग्नासाठी तिच्या धाकट्या बिहणीला तयार केले आहे. सुंबूलचे वडील एकटे आपल्या दोन मुलींचे संगोपन करतात. सुंबूल 6 वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. तेव्हापासून तिचे वडील तिचा आणि बहिणीचा एकटेच सांभाळ करतात.

News18लोकमत
News18लोकमत

याविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली की, ‘आमचे वडील आमच्यासाठी सर्वात मोठे प्रेरणास्त्रोत आहेत. ते नेहमीच आमची सपोर्ट सिस्टीम राहिले आहेत. मी आणि सानिया माझ्या वडिलांसाठी खूप खूश आहोत.’ ती म्हणाली की, ती बऱ्याच दिवसांपासून तिच्या वडिलांना दुसऱ्या लग्नासाठी तयार करण्याचा प्रयत्न करत होती, पण सुरुवातीला ते त्यासाठी तयार नव्हते. मला खूप आधीपासून त्यांनी लग्न करावे असं वाटतं होते, पण दुसरं लग्न करण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी होणं हे देखील महत्त्वाचं होतं.

जाहिरात

सुंबूलनं बिग बॉसमध्ये इंट्री घेतल्यानंतर तिचे वडील तौकीर खान हे देखील फेमस झाले होते. सुंबूल आणि तौकिर खान यांची बाँडिंग दर्शवणारे फोटो आणि व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुंबूल आणि तिच्या लहान बहिणीचे पालनपोषण त्यांच्या वडिलांनी केले आहे. सुंबूलच्या लहान बहिणीचे नाव सानिया आहे. सुंबूलनं मुंबईत नुकतचं नवीन घर घेतलं आहे. या घराचे व्हिडिओ देखील तिनं सोशल मीडियावर शेअर केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात