बॉलिवूडची चुलबुली गर्ल काजोल देखील श्रीमंत कलाकारांच्या लिस्टमध्ये आहे. पण तरीही तिला वायफळ खर्च करणं आवडत नाही. करण जौहरने अनेकदा तिला कंजूस म्हटलं आहे.
अभिनेता सलमान खान आजही वांद्रे येथील 2BHK फ्लॅटमध्ये राहतो. कोटींची संपत्ती असूनही तो खर्च करण्यात थोडा हात आखडता घेतो.
जॉन अब्राहम देखील बॉलिवूडचा एक सक्सेसफुल अभिनेता आहे. पण मी एक चप्पल, एक जीन्स आणि एक टी-शर्टवर संपूर्ण वर्ष काढू शकतो असं जॉन म्हणतो.
अभिनेता शाहरूख खान देखील सर्वात श्रीमंत असला तरी तो देखील विचारपूर्वक खर्च करण्यावर विश्वास ठेवतो.
अभिनेता विक्की कौशल देखील आयुष्यात खर्च करताना खूप विचार करून खर्च करतो. मेहनतीचे पैसे खर्च करताना तो विचारपूर्वक खर्च करतो.
अभिनेत्री श्रद्धा कपूर तर सेल असलेल्या ठिकाणी कपड्यांची खरेदी करते. तू झूठी मैं मक्कार या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान श्रद्धाने हा खुलासा केला होता.