जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / रितेश देशमुखमुळं झालं किरण मानेंच्या आईचं स्वप्न पूर्ण, रितेशच्या 'त्या' दोन शब्दांनी जिंकलं सर्वांचं मन

रितेश देशमुखमुळं झालं किरण मानेंच्या आईचं स्वप्न पूर्ण, रितेशच्या 'त्या' दोन शब्दांनी जिंकलं सर्वांचं मन

रितेश देशमुखमुळं झालं किरण मानेंच्या आईचं स्वप्न पूर्ण

रितेश देशमुखमुळं झालं किरण मानेंच्या आईचं स्वप्न पूर्ण

किरण माने यांनी नुकतीच एक बिग बॉसच्या घरातील एक आठण शेअर केली आहे. किरण माने यांचे एक स्वप्न होतं, ते स्वप्न या घरानं आणि रितेश देशमुखनं पूर्ण केलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 जून- बिग बॉस फेम किरण माने यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. किरण माने नेहमीच्या त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळं सर्वांचे लक्षवेधून घेत असतात. बिग बॉस मराठीच्या घरात देखील किरण माने यांची साधी राहणी प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे. किरण माने यांनी नुकतीच एक बिग बॉसच्या घरातील एक आठण शेअर केली आहे. किरण माने यांचे एक स्वप्न होतं, ते स्वप्न या घरानं आणि रितेश देशमुखनं पूर्ण केलं. त्याचाच एक किस्सा किरण माने यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. काय आहे किरण मानेंची पोस्ट? किरण माने यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. रितेश देशमुख आणि जिनिलिया जेव्हा बिग बॉसच्या घरात आले होते तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेअर करत किरण मानेंनी रितेशचे आभार मानले आहेत. त्यांनी या व्हि़डिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की,कधी-कधी आपल्या काळजाच्या जवळच्यांचं एखादं छोट्टंसं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो तवा जे समाधान मिळतं ते शब्दांत नाय सांगू शकत ! वाचा- ‘मी माफी मागायला तयार पण…‘त्या छपरी डायलॉग्जवर वाद वाढताच लेखकांची प्रतिक्रिया माझी आई रितेश देशमुखची लै मोठ्ठी फॅन ! मी एकदा तरी रितेशला भेटावं अशी तिची लै लै म्हंजी लैच इच्छा होती. ‘बिगबाॅस’नं ती इच्छा पूर्ण केली. रितेशला मी जेव्हा हे सांगीतलं तेव्हा रितेशनं मला मिठी मारून कॅमेर्‍याच्या लेन्समध्ये बघितलं आणि म्हणाला, “आईS नमस्कार.” …घरातले सांगतात, त्यादिवशी आई खूप खुश होती ! लब्यू बिगबाॅस… लब्यू रितेश. ❤️

News18लोकमत
News18लोकमत

किरण मानेंच्या वर्कफ्रंटबाबत किरण मानेंच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर नुकतच ते रावरंभा चित्रपटात झळकले होते. याशिवाय मानेंची एक मराठी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ते महेश मांजरेकरांच्या आगामी चित्रपटातही काम करत आहेत.

जाहिरात

किरण माने यांच्याविषयी थोडं.. किरण माने यांचा जन्म 5 एप्रिल 1970 रोजी सातारा जिल्ह्यातील मायणी गावात झाला. शालेय शिक्षणापासूनच त्यांना नाटक आणि नाटकांमध्ये अभिनय करण्याची आवड होती, पण त्यांचे जीवन तितके सोपे नव्हते. आपल्या कठोर परिश्रमाने आणि जिद्दीने वैभवाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला आहे.किरण माने यांना लहानपणापासूनच अभिनय आणि नाटकांची आवड होती आणि नंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी किरण ऑटोमोटिव्ह नावाचे दुकान सुरू केले आणि ते त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचे दिवस होते. त्यांनी त्यांच्या दुकानात गाड्यांचे तेल विकायला सुरुवात केली, पण नंतर त्यांना कमीपणा वाटू लागला की आपण काय करतो, त्यांच्या आयुष्यात अभिनय आणि नाटकाशिवाय आयुष्य फक्त बकवास आहे.मग त्यांना पंडित सत्यद्रव कार्यशाळेच्या संदर्भात पेपरमध्ये एक जाहिरात दिसली म्हणून त्यांनी त्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि हा त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता, त्यानंतर त्यांनी त्यांच्या दुकानाला कुलूप लावले आणि ते पुन्हा कधीही उघडले नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात