मुंबई, 15 नोव्हेंबर : ‘बिग बॉस’ मराठी प्रमाणेच सध्या हिंदी बिग बॉसच्या घरातसुद्धा अनेक घडामोडी घडत आहेत. यंदाचं हे 16 वं पर्व सध्या फारच गाजतंय. या घरात रोज काही ना काही वाद होत असतात. या वादात रागाच्या भरात केल्या गेलेल्या वक्तव्यांमुळे अनेक स्पर्धक चर्चेचा विषय ठरतात. नुकतंच शिव ठाकरे आणि क=अर्चना या प्रकरणाची सगळीकडे चर्चा होती. आता बाहेर काढल्यानंतर अर्चनाने पुन्हा घरात एंट्री घेतली आहे. त्यावरून अनेक जण आपलं मत व्यक्त करत असताना अशातच आता शालीन भानोत या स्पर्धकाने नवीन वादाला तोंड फोडलं आहे. शालिनने घरातील स्पर्धक गौतम विजचा महिला म्हणून उल्लेख केला. आता यावर ‘बिग बॉस ७’ची विजेती गौहर खान हिने नाराजी व्यक्त करत शालिनची शाळा घेतली आहे. बिग बॉस सीझन 7 ची विजेती गौहर खान बोलण्यास मागेपुढे पाहत नाही. समोर कोणीही असले तरी ती आपला मुद्दा ठामपणे मांडते. अगदी बिग बॉस आणि निर्मात्यांना फटकारण्यातही ती मागे हटत नाही. सीझन 16 च्या मुद्द्यांवरही ती आपले मत मांडताना दिसत आहे. अर्चना गौतमला भडकवल्याबद्दल तिने यापूर्वी शिव ठाकरेवर टीका केली होती. आता शालिनने केलेल्या वक्त्यव्याचा निषेध करत तिने या स्पर्धकाला चांगलाच सुनावलं आहे. हेही वाचा - सारासोबत डेटिंगच्या चर्चांवर शुभमन गिले सोडलं मौन, म्हणाला..,. नुकत्याच झालेल्या कॅप्टनसीच्या टास्कमध्ये शालीनने गौतमला महिला म्हटलं. इतकंच नाही तर तो महिला आहे म्हणून तो कमजोर आहे आणि त्याचमुळे तो टास्क नीट खेळू शकत नाही असं शालीन म्हणाला. शालीनच्या या वक्तव्यावर गौहर खान प्रचंड संतापली आहे. तिने ट्वीट करत शालीनच्या या वक्तव्याचा निषेध केला. तसंच तिने शालीनची कानउघडणी केली.
गौहरने ट्विट करून लिहिले - ‘‘शालीन, महिला कमजोर नसतात. गौतमला हे बोलताना तू याचा आधी विचार करायला हवा होतास. हे अपमानकारक आहे, निराशाजनक आहे. टीका करायची तर व्यक्तिमत्त्वावर कर, त्याच्या सवयींवर कर. महिला कमजोर नसते हे तुला तुझ्या जन्माच्या वेळेस कळायला हवं होतं. तुझी आई सुद्धा एक महिला आहे. थोडा तरी आदर दाखव.’’ गौहर खानने केलेला या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया देत तिचं म्हणणं बरोबर असल्याचे सांगितलं आहे. सध्या शालीन त्याच्या या वक्तव्यामुळे प्रेक्षकांच्या मनातून उतरला आहे. ही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही शालीनने आक्षेपार्ह वक्तव्यं केली आहेत. यापूर्वी त्याने केलेल्या विधानांवरून सलमानने अनेकदा त्याची शाळा घेतली होती. त्यामुळे आता या वीकेंडच्या वार भागात सलमान याबद्दल काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
याशिवाय गौहर खानने जे ओपन हाऊसमध्ये धूम्रपान करताना दिसतात त्या स्पर्धकांना देखील फटकारले आहे. यासाठी बिग बॉसने घरातील सदस्यांना अनेकदा सावध केले असले तरी कोणीही ते ऐकत नाही. बिग बॉसच्या घरातील सर्वात विवादित स्पर्धक साजिद खान उघड्यावर सिगारेट ओढताना दिसला होता. आता त्यामुळे येणाऱ्या वीकेंडच्या वार भागात सलमान या सगळ्या प्रकाराबद्दल काय बोलणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.