मुंबई,28 जानेवारी- छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून 'बिग बॉस'ला ओळखलं जातं. सध्या बिग बॉसचा 16 वा सीजन सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या शोने धुमाकूळ घातला आहे. शोमध्ये सतत होणारे राडे, वादविवाद, प्रेम, मैत्रीने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. बिग बोस सोळाव्या महाअंतिम सोहळ्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे घरात राहण्यासाठी स्पर्धकांमध्ये मोठी चढाओढ सुरु आहे. अशातच आता एक स्ट्रॉंग स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर पडल्याचं समोर आलं आहे.
बिग बॉस हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक आहे. हा शो कधी स्पर्धकांमुळे तर कधी आपल्या फॉरमॅटमुळे वादात असतो. शोमध्ये असणारे स्पर्धक सतत आपल्या वक्तव्याने आणि खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. यंदा बिग बॉसचा सोळावा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सीजनने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. सुरुवातील या सीजनवर काही प्रमाणात टीका झाली होती. परंतु नंतर हा सीजन अतिशय रंजक बनला आहे.
बिग बॉस 16 सुरु होऊन तीन महिने उलटून गेले आहेत. हा शो तीन महिन्यांचाच असतो. मात्र वाढती टीआरपी आणि प्रेक्षकांची पसंती यामुळे यंदाचा सीजन आणखी एक महिना वाढविण्यात आला आहे. दरम्यान आता शोचा शेवटचा टप्पा जवळ आला आहे. हा शो आपल्या शेवटच्या टप्प्यावर आणखीनच रंजक बनला आहे. शोच्या शेवटच्या दिवसांनी प्रेक्षकांची उत्कंठा आखीनच वाढवली आहे. दरम्यान आता एका स्पर्धकाची शोमधून एक्झिट झाल्याची बातमी समोर आली आहे.
View this post on Instagram
या आठवड्यातील नॉमिनेट स्पर्धक-
बिग बॉसचा सोळावा सीजन आपल्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. दरम्यान शोमध्ये स्वतः ला टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धक विविध कुरघोड्या करत आहेत. अशातच बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्याच्या काही दिवस आधी एक स्पर्धक घरातून एलिमिनेट झाला आहे. या आठवड्यात प्रियांका चहर चौधरी, शिव ठाकरे, शालिन भानौत टीना दत्ता हे स्पर्धक घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होते.
हा स्पर्धक झाला घरातून बाहेर?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बोस 16मध्ये या आठवड्यात टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ता घरातून बाहेर पडल्याचं सांगण्यात येत आहे. टीनाचा बिग बॉसमधील प्रवास संपल्याचं समोर आलं आहे. याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाहीय मात्र रिपोर्ट्सनुसार फिनालेच्या काही दिवस आधीच टीना एलिमिनेट झाली आहे. हा एपिसोड शनिवार-रविवार प्रक्षेपित केला जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Entertainment, Tv actress