मुंबई, 26 जानेवारी- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता शाहीर शेख आणि त्याच्या कुटुंबासोबत एक भयानक घटना घडली आहे. काल रात्री अभिनेत्याच्या बिल्डिंगमध्ये आग लागली होती. या प्रकाराने खळबळ उडाली होती. आता अभिनेत्याची पत्नी रुचिका कपूरने हा सर्व भयानक प्रकार आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. सुदैवाने शाहीर शेखचं कुटुंब सुखरुप बचावलं आहे.
25 जानेवारीच्या रात्री अभिनेता शाहीर शेख राहात असलेल्या बिल्डिंगमध्ये अचानक आग लागल्याने खळबळ माजली होती. शाहीर शेखची पत्नी रुचिका कपूरने आता आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत हा धक्कादायक प्रकार उघड केला आहे. रुचिकाने पोस्ट शेअर करत लिहलंय, '25जानेवारीला रात्री दीड वाजता मला अचानक कॉल आला की आमच्या बिल्डिंगमध्ये आग लागली आहे. हे ऐकून मला काय करावं हे सुचायचं बंद झालं होतं. मी दार उघडून बाहेर पाहिलं, तर आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट उठले होते.
(हे वाचा:Throwback Bollywood: ऐश्वर्या रायसोबत सेटवर घडलेला भयानक अपघात; 'तो' सीन बेतला होता जीवावर )
या परिस्थितीत त्यातून बाहेर पडणं शक्य नव्हतं. कारण माझा सोबत आमची 16 महिन्यांची मुलगी आणि व्हीलचेअरवर असणारे आमचे बाबासुद्धा होते. मी घाबरुन शाहीरला फोन केला आणि त्याला सर्व परिस्थिती सांगितली. त्याला धक्का देण्याचा माझा हेतू नव्हता. परंतु त्या परिस्थिती मला दुसरं काही सुचणं शक्य नव्हतं. धुरापासून बचावासाठी आम्ही टॉवेल ओले करुन आमच्या चेहऱ्यावर गुंडाळले होते'. काही वेळेतच शाहीर आणि त्यांच्या भावाने फायर ब्रिगेडसोबत येऊन आमची मदत केली. आणि आम्हाला सुखरुप या संकटातून बाहेर काढलं'.
रुचिका कपूरने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करताच सर्व चाहत्यांसोबतच सेलिब्रेटीसुद्धा चिंता व्यक्त करत आहेत. बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुरानाने कमेंट करत रुचिका आणि शाहीरची विचारपूस केली आहे. त्याशिवाय अभिनेत्री कंगना रनौत, सोनम कपूर, अनिता हसनंदानी,क्रिस्टल डिसुझा, कृष्णा मुखर्जी अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स करत या सेलिब्रेटी कपलची विचारपूस करत त्यांना धीर दिला आहे.
शाहीर शेख हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक मालिका आणि ऍल्बम्समध्ये काम केलं आहे. कुछ रंग प्यार के ऐसेही, ये रिश्ते है प्यार के, महाभारत अशा अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये शाहीर झळकला आहे. शाहीर आणि त्याची पत्नी रुचिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tv actor