मुंबई, 21 ऑक्टोबर : टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो असणाऱ्या बिग बॉसची धमाकेदार सुरुवात झाली आहे. यंदा सीजनच्या पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांना एकापेक्षा एक धक्के बसत आहेत. या सीजनमध्ये बिग बॉसच्या घरात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. तरीसुद्धा काही स्पर्धक बिग बॉसच्या घरात उत्तम खेळ खेळत प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. त्यातीलच एक स्पर्धक बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीजनचा विजेता आणि बिग बॉस सोळाचा स्पर्धक म्हणजेच शिव ठाकरे होय. सध्या बिग बॉस हिंदीमुळे शिव ठाकरे प्रचंड चर्चेत आहे. इतकंच नव्हे तर तो सतत सोशल मीडियावर ट्रेंडदेखील होत आहे. अशातच तो आता या घराचा कॅप्टन देखील झाला आहे. दरम्यान शिव ठाकरे बिग बॉसच्याच घरात पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. शिव ठाकरे बिग बॉसची स्पर्धक सुंबुल तौकीर खान हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला होता. पण आता शिव ठाकरेने या दोघांचा अजून एक व्हिडीओ पोस्ट करत हे दोघे एकत्र असल्याच्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे. हेही वाचा - VIDEO: अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूर रिलेशनशिपमध्ये? दिवाळी पार्टीतील ‘त्या’ व्हिडिओमुळे चर्चांना उधाण शिव ठाकरेने सुंबुल तौकीरसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो तीचे डोळे पुसताना, तिच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. त्याने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय कि, ‘आम्ही दोघे बहीण भाऊ आहोत…ब्रदर- सिस्टर व्हाइब्स’. त्यामुळे आता शिव आणि सुंबुल यांच्यामध्ये बहीण भावाचं नातं असल्याचं शिवणे स्पष्टच सांगितलं आहे. या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी देखील भरभरून कमेंट्स आणि लाईक्स करत त्याला प्रतिसाद दिला आहे.
मराठमोळ्या शिव ठाकरेने बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासूनच आपली खास ओळख निर्मण करायला सुरुवात केली आहे. या शोच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिव प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. फक्त प्रेक्षकच नव्हे तर होस्ट-अभिनेता सलमान खानदेखील शिवच्या परफॉर्मन्सने इम्प्रेस झाला आहे. सलमान खानने पहिल्याच आठवड्यात शिव ठाकरेचं तोंडभरून कौतुक केलं होतं. तसेच नुकताच तो कॅप्टन्सी देखील जिंकला. त्यामुळे आता पुढे तो कसा खेळतो हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये म्हणजे शिव ठाकरे आणि विना जगताप या दोघांची जोडी चांगलीच गाजली होती. पण यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. नुकतंच वीणाने याबद्दल स्पष्टच सांगितलं होतं. तर शिवने त्याच्या लव्ह लाईफ विषयी मोठा खुलासा केला होता. आता इथून पुढे शिव ठाकरे बिग बॉसच्या घरात प्रेमात पडणार का हे चाहत्याना जाणून घ्यायचं आहे.