जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss 16: घरातील एकाही स्पर्धकाला जिंकता आला नाही कॅप्टन्सी टास्क; आता कॅप्टनशिवाय चालणार घर

Bigg Boss 16: घरातील एकाही स्पर्धकाला जिंकता आला नाही कॅप्टन्सी टास्क; आता कॅप्टनशिवाय चालणार घर

बिग बॉस 16

बिग बॉस 16

‘बिग बॉस 16’ चा मागचा आठवडा फारच रंजक होता. मागच्या आठवड्यात करण जोहर होस्ट म्हणून शोमध्ये सहभागी झाला होता. स्पर्धक मान्या सिंग या शोमधून बाहेर पडली. हा आठवडासुद्धा अतिशय रंजक बनत आहे. लेटेस्ट एपिसोडमध्ये मोठी उलथापालथ झालेली दिसून आली.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑक्टोबर-   ‘बिग बॉस 16’ चा मागचा आठवडा फारच रंजक होता. मागच्या आठवड्यात करण जोहर होस्ट म्हणून शोमध्ये सहभागी झाला होता. स्पर्धक मान्या सिंग या शोमधून बाहेर पडली. हा आठवडासुद्धा अतिशय रंजक बनत आहे. लेटेस्ट एपिसोडमध्ये मोठी उलथापालथ झालेली दिसून आली. बिग बॉस आता कुटुंबातील सदस्यांच्या बुद्धी आणि मनासोबत खेळत आहे. त्यामुळे टास्कमध्ये अनेक ट्विस्टही पाहायला मिळत आहेत. बिग बॉसने अंकित गुप्ता आणि अर्चना गौतमला मजेदार पद्धतीने फटकारलं. इतकंच नव्हे तर बिग बॉसने निम्रीत कौर अहलुवालियालाही डिवचलं. एकंदरीतच लेटेस्ट एपिसोड फारच धमाकेदार आणि रंजक होता. अर्चना गौरीला नाश्ता तयार करायला सांगते अशी या एपिसोडची सुरुवात दाखवण्यात आली आहे. यावेळी गौरी अर्चनाला नकार देते. त्यानंतर अर्चना बिग बॉसला कॅप्टन पदावरुन हटवण्यास सांगते. अर्चना गौतमने बिग बॉसमध्ये अनेकदा असं आवाहन केलं होतं. त्यानंतर बिग बॉसने अर्चनाला कॉल करून कॅप्टन पदावरून तिला मुक्त केलं आहे. सोबतच बिग बॉसने कुटुंबातील सदस्यांना लिव्हिंग रूममध्ये आमंत्रित करत, घरातील पुढचा कॅप्टन निवडण्याची प्रक्रिया स्पष्ट करतात. दरम्यान, बिग बॉसने अर्चनाला फटकारत म्हटलं की, अर्चनाला शिक्षा म्हणून हे कॅप्टन पद मिळालं होतं.तिने ते कमावलं नव्हतं. बिग बॉसचं हे मजेशीर बोलणं ऐकून घरातील सर्व सदस्यांना हसू आवरता येत नाही. **(हे वाचा:** Bigg Boss 16: गौतम-सौंदर्याच्या नात्याला करण जोहरने म्हटलं फेक; शालिनची घेतली शाळा ) अर्चनाला कॅप्टन पदावरुन हटवल्यानंतर घरात पुन्हा एकदा नवा कॅप्टन निवडण्यासाठी प्रक्रिया सुरु होते. बिग बॉसने यंदा कॅप्टन निवडीसाठी फारच रंजक टास्क दिला आहे. या टास्कदरम्यान बिग बॉसच्या घरातील सदस्यांना हॉरर खुर्चीवर बसावं लागतं. बिग बॉसच्या या आदेशानंतर पळत जाऊन शिव ठाकरे आणि गौतम विज खुर्चीवर जाऊन बसतात. पण आधी शिव बसलेला असल्यामुळे गौतमला खुर्ची सोडून उठावं लागत. मग बिग बॉस निम्रीत कौरला हॉरर रूममध्ये बोलावतात आणि तिला गौतमच्या खुर्चीखाली बसायला सांगतात. यावेळी निम्रीतला घरातील आठवड्याचं रेशन किंवा शिव यापैकी एक गोष्ट निवडायला सांगतात. तेव्हा निम्रीत घरातील रेशनचा त्याग करत शिवला कॅप्टन होण्यासाठी निवड करते.

जाहिरात

हा टास्क पूर्ण करुन जेव्हा निम्रीत कौर त्या हॉरर खोलीतून बाहेर येते तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य तिला रेशन का सोडले याचा जाब विचारायला सुरुवात करतात. निम्रीत नंतर पुढच्या फेरीत एमसी स्टॅन खुर्चीखाली बसतो आणि नियोजन केल्यानंतर शिवऐवजी रेशन निवडतो.त्यामुळे कॅप्टनची खुर्ची पुन्हा रिकामी होते. त्याच्या पुढच्या फेरीत गौतम धावत जाऊन खुर्चीवर बसतो आणि सौंदर्या शर्माला खुर्चीखाली बसण्यास सांगितलं जातं.

News18लोकमत
News18लोकमत

या फेरीत सौंदर्या शर्माला गौतमने घरातील कॅप्टन व्हावं असं वाटतं असतं. त्यामुळे ती रेशन सोडून देते. पण रेशनचा त्याग केल्यानंतर सौंदर्याला कोणी काहीही बोलत नाही. सौंदर्यानंतर पुढच्या फेरीत अंकितला खुर्चीखाली बसवलं जातं. तेव्हा अंकित चातुर्य दाखवत रेशनची निवड करतो. त्यामुळे कॅप्टनची खुर्ची पुन्हा रिकामी होते. त्यानंतर बिग बॉस हा टास्क संपवतात. रिकाम्या खुर्चीमुळे या आठवड्यात घरातील कोणीही कॅप्टन बनू शकला नाही. त्यामुळे या आठवड्यात घरात कोणीही कॅप्टन नसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात