मुंबई, 24 ऑक्टोबर- बिग बॉस 16 मध्ये सध्या सलमान खान दिसत नाहीय. आरोग्यविषयक समस्यांमुळे अभिनेत्याने दिवस शोमधून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या आठवड्यात बिग बॉसच्या सूत्रसंचालनाची धुरा दिग्दर्शक-निर्मात करण जोहर सांभाळली आहे. करण जोहर सलमानप्रमाणेच स्पर्धकांना आठवड्याचा लेखाजोखा देत आहे. इतकंच नव्हे चुकलेल्या स्पर्धकांची चांगलीच शाळादेखील घेतली आहे. ‘बिग बॉस 16’ वीकेंड का वार च्या 23 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये, खास होस्ट करण जोहरने गौतम आणि सौंदर्यावर सडकून टीका केली. त्यानंतर अर्चना गौतम वीज लव्ह कार्ड खेळत असल्याचे सांगताना दिसते. पण तिला त्यात रस नसल्याचंही ती म्हणते. गौतम आणि सौंदर्या यांच्यात प्रेम आणि द्वेषाचं नातं असल्याची चर्चा आहे. करण जोहर म्हणतो की, त्यांचं समीकरण रोज बदलत असतं पण ते फक्त कॅमेऱ्यांसाठी असतं. करण जोहरच्या तिखट आरोपांनंतर सौंदर्याने आपल्या नात्याचा बचाव केला आणि त्यानंतर लगेचच गौतमने मान्याला सौंदर्याविषयीचं तिचं विधान स्पष्ट करण्यास सांगितलं. दरम्यान करण जोहरने ती क्लिप दाखवली ज्यामध्ये मान्या असं म्हणताना दिसत आहे की, सौंदर्याला शालीन आणि गौतम या दोघांबद्दल भावना आहेत. मान्या सुरुवातीला म्हणते की, ती सौंदर्याला बाहेरुन ओळखते पण नंतर ती आपल्या वक्तव्यावरुन पलटते सौंदर्याला आधीच ओळखत असल्याचं नाकारते. दरम्यान, या प्रतिक्रियेमुळे शालीन भनौतला राग अनावर होतो. **(हे वाचा:** Bigg Boss 16: अंकितने प्रियांकासोबतच्या नात्यावर म्हटलं असं काही…करण जोहरसोबत सर्वच झाले चकित ) या सर्व आरोप-प्रत्यारोपांदरम्यान सौंदर्याने पुन्हा एकदा स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. सौंदर्याने आपला बचाव करत म्हटलं की, तिचे शालीनसोबत खूप चांगले संबंध आहेत. तथापि, करणने सांगितलं की, लोकांना वाटतं की त्यांचं नातं फक्त शोसाठी एक सेट-अप आहे. त्यानंतर करणने गौतमवर सौंदर्याची चुकीची प्रतिमा निर्माण केल्याचा आणि तिच्या चुकीबाबत कमेंट्स केल्याचाही आरोप केला. तसेच करणने शालीनला फटकरलं आणि सांगितलं की, हा काही कपल शो नाहीय.करण काल सौंदर्या-गौतम-शालिनची चांगलीच शाळा घेतली आहे. या तिघांवर तिखट शब्दात टीका करत त्यांना योग्य वाट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
करणच्या आरोपांनंतर सौंदर्या आणि मान्या वाद पाहायला मिळाला. तर निम्रीत आणि अर्चना गौतमचं सांत्वन करताना दिसतात. अर्चनाने गौतमला सल्ला दिला की, त्याने स्वत:साठी खेळून शो जिंकला पाहिजे. अर्चना नंतर सौंदर्याला सांगते की तिची भूमिका गौतमने घेतली आहे. कारण तिला कोणीतरी सांगितलं असावं की तिला बिग बॉसमध्ये टिकून राहण्यासाठी प्रेमाचा अँगल हवा आहे. त्याचवेळी अब्दू गौरीला रागावर नियंत्रण ठेवण्यास सांगताना दिसून आला.
सलमान खानला डेंग्यू- सलमान खानला डेंग्यू झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे तो ‘बिग बॉस 16’चे पुढील काही भाग होस्ट करणार नाही. अशातच सलमानला रिप्लेस म्हणून करण जोहरला बिग बॉस होस्ट करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान करण जोहर सलमानलाही नकार देऊ शकला नाही. कारण तो नेहमीच कठीण काळात करण जोहरच्या पाठीशी उभा राहिला आहे.करण जोहरने शोमध्ये येताच स्पर्धकांची चांगलीच खरडपट्टी केली आहे.