मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /BB16: बिग बॉस स्पर्धकाच्या पत्नीचा शिव ठाकरेवर कपडे चोरीचा आरोप;मॅनेजरने दिलं चोख उत्तर

BB16: बिग बॉस स्पर्धकाच्या पत्नीचा शिव ठाकरेवर कपडे चोरीचा आरोप;मॅनेजरने दिलं चोख उत्तर

शिव ठाकरे

शिव ठाकरे

मराठी मुलगा शिव ठाकरे सध्या हिंदी बिग बॉसच्या माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता असणारा शिव आता हिंदी बिग बॉसमध्ये कुठंपर्यंत मजल मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई,3  जानेवारी-   मराठी मुलगा शिव ठाकरे सध्या हिंदी बिग बॉसच्या माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता असणारा शिव आता हिंदी बिग बॉसमध्ये कुठंपर्यंत मजल मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. शोमध्ये शिव आणि इतर स्पर्धकांचे सतत काही ना काही वादविवाद होत असतात. बिग बॉसमध्ये दररोज खेळ आणि मैत्रीची समीकरणे बदलत असतात. परंतु सध्या शिव ठाकरे एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. शिव ठाकरेवर बिग बॉसमधून नुकताच बाहेर पडलेल्या विकास मनकतच्या पत्नीने धक्कादायक आरोप लावले आहेत. यामुळे सध्या सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली आहे.

बिग बॉसच्या सोळाव्या सीजनमध्ये अभिनेता विकास मनकत हा एक वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. घरात प्रवेश करताच विकासने इतर स्पर्धकांशी पंगे घ्यायला सुरुवात केली होती. या स्पर्धकाने बराच राडा करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. परंतु या आठवड्यात विकास मनकतचं एलिमिनेशन झाल्याने त्याला घराबाहेर पडावं लागलं आहे. दरम्यान घराबाहेर येताच पुन्हा विकास चर्चेत आला आहे. विकासच्या पत्नीने सध्या बिग बॉसच्या घरामध्ये असलेल्या शिव ठाकरेवर गंभीर आरोप करत खळबळ माजवली आहे.

(हे वाचा:Bigg Boss 16: बिग बॉसमधून बाहेर पडताच विकास मानकतलाचे स्पर्धकांवर गंभीर आरोप; म्हणाला 'त्यांचं तोंडदेखील... )

विकास मनकतने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आपलं एलिमिनेशन धक्कादायक असल्याचं मत माध्यमांसमोर व्यक्त केलं होतं. त्यानंतर आता विकास मनकतची पत्नी गुंजनने एक ट्विट केल्याने खळबळ माजली आहे. गुंजनने बिग बॉस स्पर्धक शिव ठाकरेवर चोरीचा आरोप लावला आहे. या आरोपाने सर्वानांच धक्का बसला आहे. गुंजनने ट्विट करत शिव ठाकरेने शोमध्ये आपल्या पतीचे कपडे चोरी केल्याचा आरोप केला आहे. गुंजनच्या मते आपण विकाससाठी घरात पाठवलेले कपडे त्याला मिळाले नाहीत. शिव ठाकरेने आपल्या पतीचे हे कपडे आणि परफ्युम लपवून ठेवल्याचं तिने म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर विकास ज्यावेळी घरातून बाहेर पडला त्यावेळी शिव ठाकरेने आपल्या पतीचा तो शर्ट घातल्याचा दावा तिने केला आहे.

आरोपांवर शिव ठाकरेच्या मॅनेजरचं प्रत्यत्तर-

विकास मनकतच्या पत्नीच्या या आरोपांवर आता शिव ठाकरेच्या मॅनेजरने चोख उत्तर देत त्यांची कानउघडणी केली आहे. शिवच्या मॅनेजरने हे सर्व आरोप फेटाळून लावत म्हटलं आहे, 'केवळ प्रसिद्धीत राहण्यासाठी हा सर्व प्रकार केला जात आहे. शिव ठाकरेचा मॅनेजर म्हणून मी या गोष्टीवर बोलू इच्छितो. कोणतेही आरोप लावण्यापूर्वी आपण शोच्या टीमशी एकदा संवाद साधून घयावा असा सल्ला मॅनेजरने दिला आहे'.

शिव ठाकरेच्या मॅनेजरच्या या पोस्ट नंतर विकासच्या पत्नीने आणखी एक ट्विट करत लिहलंय, 'मला शोच्या टीमकडून जॅकेट मिळाला असून कपडे अद्याप मिळालेले नाहीत. हे कपडे शोमधील स्पर्धकांनी वापरल्याचा मतावर मी ठाम आहे असं गुंजनने म्हटलं आहे. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे. या प्रकरणाला कोणतं नवं वळण लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First published:
top videos

    Tags: Bigg boss, Entertainment, Tv shows