जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss 16: अंकितने प्रियांकासोबतच्या नात्यावर म्हटलं असं काही...करण जोहरसोबत सर्वच झाले चकित

Bigg Boss 16: अंकितने प्रियांकासोबतच्या नात्यावर म्हटलं असं काही...करण जोहरसोबत सर्वच झाले चकित

अंकित-प्रियांका

अंकित-प्रियांका

‘बिग बॉस 16’ मध्ये काल ‘वीकेंड वॉर’ होस्ट सलमान खानशिवाय पार पडला. अभिनेत्याला डेंग्यू झाल्याने त्याने काही दिवसांसाठी शोमधून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे आज वीकेंड का वॉरची धुरा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने सांभाळली होती.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23  ऑक्टोबर-  ‘बिग बॉस 16’ मध्ये काल ‘वीकेंड वॉर’ होस्ट सलमान खानशिवाय पार पडला. अभिनेत्याला डेंग्यू झाल्याने त्याने काही दिवसांसाठी शोमधून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे आज वीकेंड का वॉरची धुरा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने सांभाळली होती. करणनेदेखील स्पर्धकांसोबत मजामस्ती केली आणि त्यांची चांगलीच शाळादेखील घेतली. नुकतंच पार पडलेल्या एपिसोडमध्ये निम्रीत, शिव, एमसी स्टॅन आणि टीन दत्ता अर्चनाविरुद्ध बंड केल्याचं दिसून पाहायला मिळालं आहे. गौरी नागोरी आणि अर्चना यांच्यातील वादाचीही बरीच चर्चा झाली. कालच्या एपिसोडमध्ये करणने गौरीच्या वागणुकीबाबत सर्व स्पर्धकांना प्रश्न विचारला होता. दरम्यान या भांडणात गौरीला पाठिंबा देणाऱ्या सर्वच स्पर्धकांची करणने शाळा घेतली. यावेळी सलमान खानप्रमाणेच करणनेही आठवड्याचा लेखाजोखा स्पर्धकांना तिखट शब्दांत सांगितला. या आठवड्यात चुकलेल्या स्पर्धकांना करणने वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. करणने गौरी नागोरीला सर्वात जास्त फटकारलं. इतकंच नव्हे तर तुम्हाला या शोमध्ये राहायचं आहे की इथून बाहेर जायचं, असा सवालही त्याने केला. परंतु गौरीने या सर्व प्रकरणावर नंतर माफीही मागितली. अर्चना गेल्या काही काळापासून शोमध्ये प्रचंड सक्रिय दिसून येत आहे. ती सतत आपलं बोलणं स्पष्टपणे सर्वांसमोर मांडत असते. आपल्या याच स्वभावामुळे ती कुटुंबातील सदस्यांच्या निशाण्यावरही येते. परंतु तरीही ती आपल्याच अंदाजात घरात वावरताना दिसून येते. **(हे वाचा:** Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात रोमॅंटिक झाले अंकित-प्रियांका; लव्हबर्ड्सचा VIDEO VIRAL ) यंदाच्या वीकेंड का वॉरबद्दल बोलायचं झालं, तर अर्चना आणि गौरी नागोरी यांच्या वादविवादात करणने अर्चनाला शोमध्ये पूर्ण साथ दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अर्चनाला सध्या प्रचंड पसंती दिली जात आहे. सोशल मीडियावरसुद्धा अर्चनाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर युजर्स अर्चनाला पाठिंबा दिल्याबद्दल करणचं कौतुक करत आहेत. त्याचबरोबर गौरी जे काही करत आहे, ते चुकीचं आहे, तिची वागणूक सहन होत नाही. अशा प्रतिक्रियाही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

जाहिरात

नुकतंच झालेल्या एपिसोडमध्ये प्रियांका आणि अंकित पुन्हा एकदा शोमध्ये रोमँटिक डान्स करताना दिसले. खरं तर करणने या दोघांना रणबीर आणि अनुष्का बनून ‘ये दिल है मुश्किल’ मधील गाण्यावर डान्स करण्यासाठी सांगितलं होतं. यावेळी प्रियांका शोमध्ये करणला सांगते की ती अंकितची चांगली मैत्रीण आहे. तर अंकित म्हणतो की आमच्या नात्याचा पहिला टप्पा आता पार झाला आहे. आता पुढे काहीही होऊ शकते. अंकितचं हे बोलणं ऐकून प्रियांकालाही खूप आश्चर्य वाटतं. यावेळी करण प्रियांका आणि अंकितच्या प्रेमाचीही चर्चा करतो. आता या दोघांचं नातं पुढे कसं बहरतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांनी उपस्थिती लावली होती. या दोघांनी आपल्या आगामी ‘थँक गॉड’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये सहभाग घेतला होता. या दोघांनी होस्ट सलमान खान आणि स्पर्धकांसोबत धम्माल मस्तीदेखील केली. या दोघांनी घरातील स्पर्धकांना विविध प्रश्न विचारले. तसेच त्यांना मजेशीर टास्कसुद्धा दिले. दरम्यान बिग बॉस 16 चे लव्ह बर्ड्स आणि ‘उडारिया’ फेम अंकित गुप्ता आणि प्रियांका चहर यांना रोमँटिक डान्स करण्याचं चॅलेंजसुद्धा दिलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात