मुंबई, 12 फेब्रुवारी : ‘बिग बॉस’ 16 चा आज ग्रँड फिनाले आहे. शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियंका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत या पाच स्पर्धकांपैकी हा शो कोण जिंकणार, याची घोषणा आज केली जाणार आहे. होस्ट सलमान खान आज विजेत्याची घोषणा करेल. तसेच या पर्वातील माजी स्पर्धक देखील ग्रँड फिनाले सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. त्यापैकी काही स्पर्धकांचा डान्स परफॉर्मन्सदेखील होईल. नुकतीच या फिनालेला सुरुवात झाली आहे. पण त्याआधी एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. बिग बॉसचा विजेता कोण होणार हे थोड्याच वेळात कळेल. पण सध्या एक स्पर्धक टॉप ५ मधून बाहेर पडल्याची माहिती समोर येत आहे. या स्पर्धकाचा प्रवास फिनालेमध्ये संपला आहे. हा स्पर्धक पाचव्या स्थानी होता आणि आता तो घरातून बाहेर पडल्याची माहिती समोर येत आहे. हा लोकप्रिय स्पर्धक घराबाहेर पडल्यानंतर आता इतर चार स्पर्धक विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत. हेही वाचा - Bigg Boss 16 finale: शिव ठाकरेच होणार बिग बॉस 16 चा विजेता? फिनालेपूर्वी व्हायरल होतोय ‘तो’ व्हिडीओ सध्या शालीन भानोटच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शालीन भानोटचा बिग बॉस 16 चा प्रवास संपल्याचे बोलले जात आहे. तो पाचव्या स्थानावर राहिला. जर हे वृत्त खरे असले तर याचा अर्थ प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे, एमसी स्टेन आणि अर्चना गौतम बिग बॉस 16 च्या विजेत्या यादीत असतील.
Exclusive On #TheKhabri Only#BiggBoss16Finale #BiggBoss16#ShalinBhanot is eliminated from the house at 5th Poistion
— The Khabri (@TheKhabriTweets) February 12, 2023
Retweet if excited for more updates
शालिन भानोतचा बिग बॉस 16 चा प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे. कधी तो टीना दत्तासोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे चर्चेत होता तर कधी सुंबुलसोबतच्या मैत्रीमुळे तो चर्चेत होता. पण त्याच्या प्रवासात वळण तेव्हा आलं जेव्हा त्याचं टीना दत्तासोबत भांडण झालं. दोघांचे भांडण इतके टोकाला गेले होते की दोघांनी एकमेकांचे तोंडही बघायला नकार दिला होता.बिग बॉस 16 शी संबंधित सर्व माहिती देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘बिग बॉस तक’ आणि ‘द खबरी’नुसार शालीन भानोटचा बिग बॉस 16 चा प्रवास संपला आहे. तो शोमध्ये 5 व्या क्रमांकावर राहिला. त्यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे.
शालीन भानोत यांनाही घरातील सच्च्या माणसाचा टॅग मिळाला आहे. कधी तो ओव्हरअॅक्टिंगमुळे तर कधी योग्य माणूस म्हणून चर्चेत होता. मात्र, शालीनने बिग बॉसमध्ये चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले. यामुळेच शालीनही बिग बॉसच्या टॉप 5 फायनलमध्ये पोहोचला आहे. आता विजेतेपद कोण जिंकणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे.