मुंबई, 27 जून : ‘बिग बॉस’ चा 16 वा सिझन यंदा खूपच गाजला. या सीझनमधील प्रत्येक कलाकार घराघरात लोकप्रिय झाले. या सीझनमध्ये गाजलेली अभिनेत्री म्हणजे श्रीजिता डे. श्रीजिता छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. आता लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाची तारीख आणि लग्नपत्रिका समोर आली आहे, जी चर्चेत आहे. श्रीजिता डे 1 जुलै रोजी प्रियकर मायकलसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. जर्मनीतील एका चर्चमध्ये दोघे एकमेकांसोबत लग्नगाठ बांधणार आहेत. कोण आहे अभिनेत्रीचा होणारा नवरा जाणून घ्या. श्रीजीता डे लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. पण तिला एका गोष्टीचं दुःख आहे ते म्हणजे तीच लग्न जर्मनीला असल्या कारणाने भारतातील तिचे मित्र मंडळी या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाहीत. याविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रीजिताने लग्नाविषयी भाष्य केलं आहे.ती म्हणाली की, ‘मी माझ्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहे. पण मला एका गोष्टीचीखंत आहे की माझे जवळचे मित्र शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक याला उपस्थित राहू शकणार नाहीत.’
श्रीजीता म्हणाली की, तिची मैत्रिण देवोलिना भट्टाचार्जी देखील लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही. रश्मी देसाई लंडनमध्ये शूटिंग करत असल्याने येऊ शकणार नाही. प्रियांका चाहर चौधरीही कामात व्यस्त आहे. श्रीजीता म्हणाली की, तिचे जे काही मित्र लग्नाला येणार नाहीत, त्यांच्यासाठी ती नंतर काहीतरी खास पार्टीचं आयोजन करेल श्रीजीता आणि मायकेल (मायकेल ब्लोहम-पेप) हे आधी चर्च मध्ये लग्न करणार आहे. त्यानंतर ती भारतात येऊन भारतीय पद्धतीने लग्न करणार आहे. या लग्नात तिचे सर्व मित्र उपस्थित राहतील. श्रीजीता डे हिचे लग्नपत्रिकाही चर्चेत आहे, ज्यावर लिहिले आहे की, ‘श्रीजीता आणि मायकलच्या लग्नासाठी तुम्हाला हार्दिक आमंत्रण आहे.’ The Kerala Story : ‘या’ कारणामुळे ‘द केरला स्टोरी’ ला OTT वर मिळत नाहीये कोणी वाली! समोर आलं सत्य अभिनेत्रीने याबद्दल सांगितले होते की, 2019 मध्ये जेव्हा ती मित्रांसोबत एका रेस्टॉरंटमध्ये होती, तेव्हा तिची तिथे मायकलशी भेट झाली. श्रीजीता तिच्या मैत्रिणींसोबत होती आणि मायकलही त्याच्या फ्रेंड सर्कलसोबत होता. दोघेही एकमेकांना पाहून हसले. श्रीजीता मायकलकडे आकर्षित झाली आणि तिथूनच दोघांची मैत्री झाली. या मैत्रीचं लवकरच प्रेमात रूपांतर झालं. कोर्ट मॅरेजनंतर ते जुलैमध्ये जर्मनीत लग्न करणार आहेत. यानंतर ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2023 मध्ये कोलकाता येथे बंगाली पद्धतीने लग्न करतील.
श्रीजीताचा होणार नवरा जर्मनीचा असल्याने लग्नानंतर काही वर्षातच ती जर्मनीला शिफ्ट होणार असल्याचे श्रीजीताने सांगितले होते. पण नुकत्याच केलेल्या या पोस्टमध्ये तिने भारत सोडून जाणार नसल्याचं सांगितलं आहे.