नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध शो बिग बॉग आपल्या नव्या सीजनसह प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहे. प्रेक्षकांसाठी लवकरच बिग बॉस 15 (Bigg Boss 15) सुरू होणार आहे. नेहमीप्रमाणे यंदाही सलमान खान (Salman Khan) शो को होस्ट करताना दिसणार आहे. बिग बॉस सुरू होण्यापूर्वी सलमान खान आपल्या फी मुळे चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान (Salman Khan) बिग बॉस 15 (Bigg Boss 15) शो होस्ट करण्यासाठी 350 कोटी रुपये घेणार आहे. शोसाठी सलमान खान (Salman Khan) द्वारा घेतली जाणारी फी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमानने स्वत: याबद्दल माहिती दिलेली नाही. मात्र ट्विटर हँडलवरील सूत्रांकडून या बातमीची पुष्टी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘LetsOTT Exclusive: #SalmanKhan will be paid a huge remuneration for Bigg Boss 15 - ₹350 crores for 14 weeks. आता सलमान खानच्या फीवर सर्वांचे लक्ष आहे. सोशल मीडियावर हे ट्वीट वाऱ्यासारखं पसरलं आहे.
LetsOTT Exclusive: #SalmanKhan will be paid a huge remuneration for Bigg Boss 15 - ₹350 crores for 14 weeks. pic.twitter.com/PgXeZgYp6p
— LetsCinema (@letscinema) September 18, 2021
हे ही वाचा- Bigg Boss Marathi 3 : एक लोककलेची राणी आणि दुसरी अदांची खाण; यांना ओळखलं का? यासोबत सोशल मीडियावर शोवरुन अनेक बातम्या समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस 15’ मध्ये जे कंटेस्टेंट्समध्ये एन्ट्री करणार आहेत, त्यांना पुढील आठवड्यात क्वारंटाइन व्हावं लागेल. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान या शोमध्ये टीना दत्ता (Tina Datta), मानव गोहिल (Manav Gohil), करन कुंद्रा (Karan Kundra), अफसाना खान (Afsana Khan), सिंबा नागपाल (Simba Nagpal), रीम शेख (Reem Shaikh) आणि अमित टंडन (Amit Tandon) सामील होणार असल्याचं समोर आलं आहे.