मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss15: 'उडान' फेम 'इमली'ची होणार बिग बॉसमध्ये एन्ट्री; जाणून घ्या ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण

Bigg Boss15: 'उडान' फेम 'इमली'ची होणार बिग बॉसमध्ये एन्ट्री; जाणून घ्या ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण

'बिग बॉस १५' मध्ये झळकण्यासाठी तयार असलेली विधी पांड्या छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

'बिग बॉस १५' मध्ये झळकण्यासाठी तयार असलेली विधी पांड्या छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

'बिग बॉस १५' मध्ये झळकण्यासाठी तयार असलेली विधी पांड्या छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 1ऑक्टोबर- अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिएलिटी शो 'बिग बॉस'(Bigg Boss 15) ला उद्यापासून अर्थातच २ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या शोमध्ये आपल्या लाडक्या टीव्ही कलाकारांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. दरम्यान घरात एन्ट्री करणाऱ्या स्पर्धकांची लिस्ट समोर आली आहे. यामध्ये 'उडान' (Udan) फेम अभिनेत्री विधी पांड्याच्या(Vidhi Pandya) नावाचासुद्धा समावेश आहे. जाणून घेऊया विधीबद्दल काही महत्वाच्या गोष्टी.

View this post on Instagram

A post shared by Vidhi Pandya (@vidhiipandya)

कोण आहे विधी पांड्या-

'बिग बॉस १५' मध्ये झळकण्यासाठी तयार असलेली विधी पांड्या छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. विधीने 'उडान' या मालिकेत 'इमली'ची भूमिका साकारली होती. उडान या मालिकेमुळे विधी घराघरात पोहोचली आहे. या मालिकेमध्ये विधी मुख्य अभिनेत्रीच्या बहिणीच्या भूमिकेत होती. मात्र इमलीची भूमिकाही भाव खाऊन गेली होती. मालिकेतील चकोर-इमली या बहिणीची जोडी फारच लोकप्रिय झाली होती. विधी पांड्याची उडान ही मालिकासुद्धा कलर्स वाहिनीवरच प्रसारित होत होती.

(हे वाचा:Bigg Boss15: बिग बॉसच्या घरात 16वा स्पर्धक ठरला जय भानुशाली; मेकर्सनी ऐनवेळी....)

इतर मालिका-

विधी पांड्याने मोजक्याच मालिका करत आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री विधी पांड्याने 'तुम ऐसेही रेहना' या मालिकेतून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. या मालिकेत विधीने किरण महेश्वरी अशी भूमिका साकारली होती. त्यांनतर विधी टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो 'बालिका वधू'मध्येसुद्धा दिसून आली होती. बालिका वधूमध्ये विधीने निधी आनंद अशी भूमिका साकारली होती. तसेच 'एक दुजे के वास्ते' या मालिकेत विधीने कनिका कपूरला रिप्लेस केलं होतं. या भूमिकांमधून ती रसिक प्रेक्षकांच्या नजरेत आली होती. तसेच ती क्राईम पेट्रोलसारख्या शोमध्येही दिसून आली आहे.

(हे वाचा:Bigg Boss 15: दिव्या अग्रवालची बिग बॉसच्या घरात होणार एन्ट्री ... )

२०१४ पासून अभिनय क्षेत्रात सक्रिय-

विधी पांड्या सन २०१४ पासून छोट्या पडद्यावर अभिनय करत आहे. विधिने अगदी कमी वेळेत आपलं स्थान निर्माण केलं आहे. तिची लोकप्रियताही विशेष आहे. सध्या ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे १६९K फॉलोअर्स आहेत. ती सतत सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. विधीला सैरसपाटा करण्याची प्रचंड आवड आहे. त्यामुळे ती सतत सुट्टीचा आनंद घेताना दिसून येते.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment