मुंबई,1 ऑक्टोबर- टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो म्हणून ‘बिग बॉ**स’(Bigg Boss)**ची ओळख आहे. बहुप्रतीक्षित या शोसाठी फक्त एक दिवस शिल्लक राहिला आहे. २ ऑक्टोबर (2 October) पासून हा शो आपल्या भेटीला येणार आहे. घरातील सर्व स्पर्धकांची नवे आपल्यासमीर आलेलीच आहेत. मात्र शो मेकर्सनी शो सुरु होण्याच्या एक दिवस आधी शोमध्ये एक मोठा ट्विस्ट आणला आहे. शोच्या एकदिवस आधी मेकर्सनी अभिनेता, होस्ट जय भानुशालीला (Jay Bhanushali) घरामध्ये थेट प्रवेश दिला आहे. जय बिग बॉस १५(Bigg Boss 15) मध्ये स्पर्धक म्हणून दिसून येणार आहे. जय बिग बॉसच्या घरात जाणारा १६ वा स्पर्धक आहे.
सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेल्या ‘बिग बॉस १५’ मध्ये कोणत्या स्पर्धकांचा घरात प्रवेश होणार याचा खुलासा आधीच झाला आहे. या सर्व १५ स्पर्धकांची नवे आपल्यासमोर आलेली आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, शो मेकर्स अशा चेहऱ्याच्या शोधात होते जे टीव्हीवर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. जेव्हा स्पर्धकांची घरामध्ये एन्ट्री होणार होती त्याच्या एक दिवस आधी जय भानुशालीसोबत डील झाल्याचं मेकर्सनी म्हटलं आहे. (हे वाचा: Bigg Boss 15: सलमान खानच्या शोमध्ये या 5 नावांची एन्ट्री झाली … ) जय भानुशाली हा एक टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय असणारा चेहरा आहे. जय एक अभिनेता तर आहेच शिवाय तो एक होस्टसुद्धा आहे. जय भानुशालीने डान्स इंडियासारखे डान्स शो आणि इंडियन आयडॉलसारखे सिंगिंग शो होस्ट केले आहेत. जयला होस्टच्या रूपात मोठ्या प्रमाणात पसंत केलं जातं. त्याचं बोलणं, त्याची विनोदवृत्ती चाहत्यांचं मन जिंकून जाते. जयने कुमकुम, कसौटी जिंदगी कि, किस डेस मी है मेरा दिल यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच जय स्पर्धक म्हणून झलक दिखला जा, कौन जितेगा बॉलिवूड का टिकट, इस जंगल से मुझे बचाओ आणि खतरों के खिलाडी यांसारख्या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. तसेच छोट्या पडद्याबरोबरच जयने बॉलिवूडमध्येही आपलं नशीब आजमावलं आहे. त्याने हेट स्टोरी आणि एक पहेली लीलासारखे चित्रपट केले आहेत. (**हे वाचा:** Bigg Boss 15: रिया चक्रवर्तीची होणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री … ) बिग बॉस १५ उद्यापासून आपल्या भेटीला येत आहे. उद्या प्रीमियरमध्ये सर्व स्पर्धकांची तोंडओळख केली जाईल. मात्र तत्पूर्वी सर्व स्पर्धकांच्या नावाचा खुलासा झाला आहे. यावेळी बिग बॉसमध्ये अनेकप्रसिद्ध चेहरे दिसणार आहेत. करण कुंद्रा, सिंबा नागपाल, उमर रियाज, ईशान सेहगल, विशाल कोतिया, तेजस्वी प्रकाश, अकासा सिंह,अफसाना खान, विधि पांड्या, डोनल बिष्ट, साहिल श्रॉफ आणि मीशा अय्यर तसेच शमिता शेट्टी, प्रतीक सहेजपाल, निशांत भट्ट यांचासुद्धा स्पर्धक म्हणून सहभाग होणार आहे.