जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सलमान खाननं रेंटवर दिलं वांद्रयातील अपार्टमेंट! महिन्याला घेणार इतकं भाडं

सलमान खाननं रेंटवर दिलं वांद्रयातील अपार्टमेंट! महिन्याला घेणार इतकं भाडं

सलमान खाननं रेंटवर दिलं वांद्रयातील अपार्टमेंट! महिन्याला घेणार इतकं भाडं

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानकडं (Salman Khan) अफाट संपत्ती आहे. मात्र तो अनेक वर्षांपासून वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 डिसेंबर-  बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता सलमान खानकडं   (Salman Khan)  अफाट  संपत्ती आहे. मात्र तो अनेक वर्षांपासून वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. जे मुंबई शहरातील वांद्रे बँडस्टँडजवळ आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी ही एक आश्चर्यकारक  गोष्ट आहे. कारण सलमानची इच्छा असेल तर तो वाटेल तितकी सुंदर जागा आपल्याला राहण्यासाठी निवडू शकतो. परंतु सलमान खानचं या घराशी  एक भावनिक नातं आहे. त्यामुळे त्याला इतर कुठंही राहायला आवडत नाही.

null

आता सलमान खाननं मुंबईतील त्याची एक टॉप प्रॉपर्टी भाड्याने दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमाननं  भाड्यानं  दिलेलं अपार्टमेंट 14व्या मजल्यावर 758 स्क्वेअर फूट क्षेत्रात आहे. अभिनेत्यानं  त्याचं  एक अपार्टमेंट मुंबईतील शिवस्थान हाइट्स, वांद्रे पश्चिम येथे 95,000 रुपये मासिक भाड्यानं  दिलं आहे.मनी कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, Zapki.com ने ऍक्सेस केलेल्या कागदपत्रांवरून असं  दिसून येतं  की सलमानच्या अपार्टमेंटसाठीचा करार 6 डिसेंबर रोजी नोंदणीकृत झाला होता. हा करार ३३ महिन्यांसाठी असल्याचं  अहवालात सांगण्यात आलं  आहे. नवीन भाडेकरूचं  स्वागत करण्यासाठी सलमान सज्ज असल्याचं  दिसतं. भाडेकरूनं  सिक्युरिटी मनी म्हणून २.८५ लाख रुपये जमा केल्याचं  अहवालात म्हटलं आहे. सलमान खानची मुंबई आणि आसपासच्या परिसरात विविध संपत्ती आहे. त्यानं वांद्रे येथे 8.25 लाख रुपये दरमहा डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्यानं  घेतल्याची माहिती आहे. रिपोर्टनुसार, मकबा हाइट्सच्या 17व्या आणि 18व्या मजल्यावर असलेल्या या डुप्लेक्सचे मालक बाबा सिद्दीकी आणि जीशान सिद्दीकी आहेत. महेश मांजरेकर यांनी एकदा खुलासा करत म्हटलं होतं की, सलमान खान त्याच्या अपार्टमेंटमधील 1 बीएचकेमध्ये  राहतो. याशिवाय पनवेल शहराच्या बाहेरील भागात सलमानचं  मोठं  फार्महाऊस आहे. सध्या सलमान खान ‘बिग बॉस 15’ होस्ट करत आहे. तसेच तो आगामी काळात ‘टायगर 3’, ‘कभी ईद कभी दिवाली’ आणि ‘किक 2’ मध्ये दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात